मस्तच! WhatsApp वर जुने मेसेज शोधायचे असतील तर नो प्रोब्लेम; ‘हे’ दमदार फीचर करेल मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 02:26 PM2024-02-29T14:26:02+5:302024-02-29T14:31:28+5:30

तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेला पाठवलेले मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ अँड्रॉइड फोनवर किंवा चॅटमध्ये सहज शोधू शकाल.

WhatsApp search by date function search message how it is work | मस्तच! WhatsApp वर जुने मेसेज शोधायचे असतील तर नो प्रोब्लेम; ‘हे’ दमदार फीचर करेल मदत

फोटो - zeenews

WhatsApp ने एक नवीन फीचर आणण्याची घोषणा केली आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेला पाठवलेले मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ अँड्रॉइड फोनवर किंवा चॅटमध्ये सहज शोधू शकाल. हे फीचर iOS, Mac आणि WhatsApp वेबवर आधीच उपलब्ध होतं. या फीचरची घोषणा फेसबुकची मूळ कंपनी मेटाचे फाउंडर आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या WhatsApp चॅनलवर केली आहे.

झुकेरबर्गने शेअर केला व्हिडीओ 

मार्क झुकेरबर्गने सांगितलं की, आता WhatsApp वर तुम्हाला कोणत्याही जुन्या चॅटमध्ये पाठवलेले मेसेज सहज सापडतील. स्वतः एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे दाखवण्यात आलं आहे. हे नवीन फीचर खूप उपयुक्त असल्याचं देखील सांगितलं आहे.

WhatsApp च्या या नवीन फीचरमध्ये तुम्ही फक्त एक तारीख निवडून त्या दिवसाच्या चॅट्स शोधू शकता. कंपनीचे म्हणणे आहे की, 'जुने इंटरेस्टिंग मेसेज शोधण्यासाठी किंवा एखाद्याला पाठवलेली माहिती पुन्हा तपासण्यासाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरेल. यामुळे चॅट शोधणं सोपं होईल.

कसं वापरायचं?

-  ग्रुप आणि चॅट ओपन करा.
- वरती असलेल्या सर्च आयकॉनवर टॅप करा.
- आता तुम्हाला तेथे कॅलेंडर आयकॉन देखील दिसेल.
- कॅलेंडर आयकॉनवर टॅप करून तुम्ही तुम्हाला हवी असलेली तारीख निवडा.
- तुम्हाला निवडलेल्या तारखेचे सर्व मेसेज दिसतील.

WhatsApp ने म्हटलं आहे की या फीचरचा वापर करून तुम्ही चॅटमध्ये उपस्थित मीडिया (जसे फोटो, व्हिडीओ), लिंक्स आणि डॉक्युमेंट्स देखील शोधू शकता.
 

Web Title: WhatsApp search by date function search message how it is work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.