दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 07:19 PM2024-11-06T19:19:48+5:302024-11-06T19:19:48+5:30

WhatsApp आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणणार आहे, ज्याद्वारे युजर्स फोटो खरा आहे की खोटा हे जाणून घेऊ शकणार आहेत.

whatsapp search on web feature is out for select beta users know details | दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?

दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?

WhatsApp आपल्या युजर्ससाठी एक नवीन फीचर आणणार आहे, ज्याद्वारे युजर्स फोटो खरा आहे की खोटा हे जाणून घेऊ शकणार आहेत. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणताही फोटो इंटरनेटवर कुठे उपलब्ध आहे की नाही हे तपासू शकता. सध्या हे फीचर काही निवडक युजर्सना दिलं जात आहे, परंतु ते लवकरच सर्व युजर्ससाठी येऊ शकतं. आजकाल लोक फोटो बदलून खोट्या बातम्या पसरवत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी WhatsApp हे एक नवीन फीचर आणत आहे.

नव्या फीचरमुळे युजर्सना फोटोबाबत योग्य माहिती मिळेल. हे फीचर वापरण्यासाठी, तुम्हाला जो फोटो चेक करायचा आहे त्यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर, तुम्हाला तीन डॉटवर क्लिक करावं लागेल आणि वेब सर्च हा पर्याय निवडावा लागेल. यानंतर, WhatsApp इंटरनेटवर तो फोटो शोधेल आणि हा फोटो आधी कुठे दिसला आहे त्याबाबत माहिती देईल. यावरून तुम्हाला हा फोटो खरा आहे की खोटा हे कळेल.

WhatsApp च्या या फीचरच्या मदतीने कोणीही सहज फोटो चेक करू शकतो. या फीचरचा कसा वापर करायचा हे तुमच्यावर आहे. जेव्हा तुम्ही एखादी इमेज सर्च करता तेव्हा ती इमेज गुगलला पाठवली जाते, पण WhatsApp ती इमेज सेव्ह करत नाही. तुम्हाला योग्य माहिती मिळावी म्हणून WhatsApp फक्त गुगलची मदत घेतं. यामुळे तुम्हाला फोटोबाबतची सत्यता सहज समजू शकते.

आत्तापर्यंत, WhatsApp चं हे जबरदस्त फीचर फक्त काही खास लोकांना देण्यात आलं आहे, ज्यांनी Google Play Store वरून WhatsApp चं बीटा व्हर्जन डाउनलोड केलं आहे. पण लवकरच WhatsApp हे फीचर सर्व युजर्ससाठी उपलब्ध करून देणार आहे. या फीचरमुळे युजर्स WhatsApp वरच झटपट फोटोंची सत्यता तपासू शकतील.
 

Web Title: whatsapp search on web feature is out for select beta users know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.