WhatsApp झालं डाऊन, युजर्सना मोठा फटका; तुम्हालाही मेसेज पाठवताना प्रॉब्लेम येतोय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 01:18 PM2022-10-25T13:18:05+5:302022-10-25T13:36:56+5:30

WhatsApp down : गेल्या तासाभरापासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झालं आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं म्हटलं जात आहे.

WhatsApp services have been down for the last 30 minutes. | WhatsApp झालं डाऊन, युजर्सना मोठा फटका; तुम्हालाही मेसेज पाठवताना प्रॉब्लेम येतोय का?

WhatsApp झालं डाऊन, युजर्सना मोठा फटका; तुम्हालाही मेसेज पाठवताना प्रॉब्लेम येतोय का?

Next

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. अनेकांना व्हॉट्सअ‍ॅप शिवाय करमत देखील नाही. फोटो, व्हिडीओ आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी व्हॉट्सअ‍ॅपवरून सहज शेअर करता येतात. मात्र गेल्या तासाभरापासून देशभरात व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झालं आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं म्हटलं जात आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप आणि पर्सनलवर देखील यामुळे मेसेजेस पाठवता येत नसल्याचं समोर आलं आहे. अनेकांनी याबाबत ट्विट केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा नेमकं कधी सुरू होणार याबाबत युजर्सकडून विचारणा करण्यात येत आहे. व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानंतर आता ट्विटरवर मीम्स देखील व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: WhatsApp services have been down for the last 30 minutes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.