WhatsApp चे नवे अपडेट; स्टेटसवर 1 मिनिटाचा व्हिडिओ शेअर करता येणार, पाहा डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:37 PM2024-03-19T13:37:24+5:302024-03-19T13:39:33+5:30
WhatsApp Status Update: WhatsApp आपल्या स्टेटस अपडेटबाबत एक नवीन फीचर आणले आहे.
WhatsApp New Feature: भारतातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप WhatsApp एकामागून एक नवीन फीचर्स आणत आहे. अलीकडेच कंपनीने स्क्रीनशॉट ब्लॉक, हे नवीन फीचर आणले. त्यानंतर आता कंपनीने स्टेटस व्हिडिओबाबत मोठे अपडेट आणण्याची तयारी केली आहे. हे नवीन फीचर आल्यानंतर युजर्स स्टेटस अपडेटवर एक मिनिटापर्यंतचा व्हिडिओ शेअर करू शकतील.
सध्या व्हॉट्सॲपवर स्टेटसवर फक्त 30 सेकंदाचा व्हिडिओ पोस्ट केला जाऊ शकतो. मात्र आता हे नवीन फीचर आल्यानंतर स्टेटस व्हिडिओची वेळ वाढेल. WABetaInfo ने ट्विटरवरुन या नवीन फीचरची माहिती दिली आहे. एवढंच नाही तर WABetaInfo ने नवीन फीचरचा स्क्रीनशॉटदेखील शेअर केला आहे.
📝 WhatsApp beta for Android 2.24.7.6: what's new?
— WABetaInfo (@WABetaInfo) March 19, 2024
WhatsApp is rolling out a feature to share videos of up to 1 minute in length via status updates, and it’s available to some beta testers! Some users may get the same feature with the previous update.https://t.co/jtNAqaAb8npic.twitter.com/fHOidmCPRO
या फीचरची अनेक दिवसांपासून मागणी
कंपनी हे नवीन फीचर बीटा यूजर्ससाठी आणत आहे. बीटा युजर्स Android 2.24.7.6 साठी WhatsApp बीटामध्ये हे अपडेट पाहू शकतात. यूजर्स बऱ्याच दिवसांपासून स्टेटसमध्ये मोठे व्हिडिओ शेअर करण्याची मागणी करत होते. आता अखेर त्यांची ही मागणी पूर्ण होत आहे. बीटा चाचणी पूर्ण झाल्यानंतरच हे फीचर इतर युजर्ससाठी सुरू केले जाईल.
स्टेटस अपडेट फीचरशिवाय व्हॉट्सॲप आणखी एका फीचरवरही काम करत आहे. या फीचरमध्ये तुम्ही व्हॉट्सॲपवर UPI पेमेंटसाठी QR कोड स्कॅन करू शकाल. WABetaInfo च्या अहवालात असे म्हटले आहे की, कंपनी या फीचरची बीटा चाचणी करत आहे. चाचणी झाल्यानंतरच हे फीचर जागतिक वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.