WhatsApp Stickers च्या माध्यमातून पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा; असे करा डाउनलोड नवनवीन स्टिकर्स

By सिद्धेश जाधव | Published: September 10, 2021 11:39 AM2021-09-10T11:39:20+5:302021-09-10T11:39:31+5:30

Ganesh Chaturthi 2021: WhatsApp Stickers च्या मदतीने तुम्ही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा पाठवू शकता.  

whatsapp stickers for Ganesh chaturthi 2021 how to download and send whatsapp stickers  | WhatsApp Stickers च्या माध्यमातून पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा; असे करा डाउनलोड नवनवीन स्टिकर्स

WhatsApp Stickers च्या माध्यमातून पाठवा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा; असे करा डाउनलोड नवनवीन स्टिकर्स

Next

कोरोना काळात सण व्हर्च्युअल साजरे करण्याची वेळ आली आहे. यात व्हॉट्सअ‍ॅपवरील शुभेच्छांचा मोठा वाटा आहे. फक्त टेक्स्ट मेसेज किंवा इमेजेस पाठवून सर्वचजण शुभेच्छा देतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवर इतर हटके पर्याय आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या शुभेच्छा पाठवू शकता. यात GIFs, स्टिकर्स आणि व्हिडीओजचा समावेश आहे. यातील स्टिकर्सचा वापर करून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना पाठवू शकता. पुढे आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवरून गणेश चतुर्थीचे स्टिकर कसे पाठवायचे हे सांगितले आहे.  

गणेश चतुर्थीचे स्टिकर्स व्हॉट्सअ‍ॅपवरून कसे पाठवायचे 

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर Ganesh Chaturthi 2021 WhatsApp stickers असे सर्च करा. प्ले स्टोरवर तुम्हाला अनेक थर्ड पार्टी स्टिकर पॅक मिळतील. iOS वर थर्ड पार्टी स्टिकर्स नसल्यमुळे आयफोन युजर्स Sticker.ly नावाचे अ‍ॅप डाउनलोड करू शकतात.  
  • अँड्रॉइड युजर्सना गुगल प्ले स्टोरवरून आवडीचा एक स्टिकर पॅक अ‍ॅप निवडावा लागेल आणि तो इंस्टॉल करावा लागेल.  
  • स्टिकर पॅक अ‍ॅप डाउनलोड झाल्यानंतर तो ओपन करा आणि Open Sticker Packs ऑप्शनवर क्लिक करा. 
  • असे केल्यावर समोर गणेश चतुर्थी स्टिकर पॅकची यादी येईल. यात स्टॅटिक स्टिकर सोबत अ‍ॅनिमेटेड स्टिकर पॅक देखील मिळतील. त्यापैकी आवडीचा स्टिकर पॅक निवडा आणि + आयकॉनवर क्लिक करा. 
  • स्टिकर अ‍ॅप मध्ये तुम्हाला अनेक स्टिकर पॅक दिसतील आणि तुम्ही हवे तितके पॅक अ‍ॅड करू शकता. त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप आयकॉनवर क्लिक करून ते व्हॉट्सअ‍ॅपमध्ये अ‍ॅड करायचे आहेत आणि कंफर्म करायचे आहे.  
  • त्यानंतर तुम्ही अ‍ॅड केलेले स्टिकर पॅक तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप के स्टिकर सेक्शनमध्ये दिसू लागतील. इथून तुम्ही हे स्टिकर निवडून तुमच्या नातेवाईक आणि मित्र मैत्रिणींना पाठवू शकता. तसेच ही पद्धत वापरून प्रत्येक सणाला तुम्ही नवनवीन स्टिकर्स शोधू शकता.  

Web Title: whatsapp stickers for Ganesh chaturthi 2021 how to download and send whatsapp stickers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.