Whatsapp Stickers च्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 03:59 PM2018-12-04T15:59:14+5:302018-12-04T16:17:40+5:30

व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप स्टिकर्स हे फीचर आणले आहे. युजर्स अनेक दिवसांपासून या फीचरची आतुरतेने वाट पाहत होते. स्नॅपचॅट आणि हाइक यामध्ये या फीचरचा वापर आधीपासूनच केला जात आहे.

whatsapp stickers spice up chats here is everything you need to know about this new feature in 10 points | Whatsapp Stickers च्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Whatsapp Stickers च्या 'या' खास गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

Next
ठळक मुद्देव्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप स्टिकर्स आणले आहेतस्नॅपचॅट आणि हाइक यामध्ये या फीचरचा वापर आधीपासूनच केला जात आहे. स्टिकर्स आणि इमोजींच्या माध्यमातून संवाद साधाणं लोकांना अधिक आवडतं.

नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत लोकप्रिय माध्यम असून व्हॉट्सअॅप नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअॅपने काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅप स्टिकर्स हे फीचर आणले आहे. युजर्स अनेक दिवसांपासून या फीचरची आतुरतेने वाट पाहत होते. स्नॅपचॅट आणि हाइक यामध्ये या फीचरचा वापर आधीपासूनच केला जात आहे. स्टिकर्स आणि इमोजींच्या माध्यमातून संवाद साधणं लोकांना अधिक आवडतं. परंतु अनेक युजर्सना हे स्टिकर्स कसे वापरायचे किंवा नेमके व्हॉट्सअॅपमध्ये हे फिचर कुठे आहे? हे माहीत नाही. या फीचरबाबतची खास माहिती जाणून घेऊया. 

1. व्हॉट्सअॅप स्टिकर्स मिळवण्यासाठी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅपचे बीटा व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे. म्हणजेच तुमचं व्हॉट्सअॅप तुम्हाला अपडेट करावं लागणार आहे. 

2. अॅन्ड्रॉईड आणि iOS युजर्ससाठी हे फीचर देण्यात आले असून अॅपल अॅप स्टोर अथवा गुगल प्ले स्टोरवरून हे डाऊनलोड करता येतं. 

3. अॅप डाऊनलोड केल्यानंतर Emoji बटणावर क्लिक करा. त्यानंतर त्याखाली असलेल्या Emoji आयकॉनवर टॅप करा. 

4. व्हॉट्सअॅपने या फीचरमध्ये Cuppy, Salty, Komo, Bibimbap Friends, Unchi & Rollie, Shiba Inu, The Maladroits, Koko, Hatch, Fearless, Fabulous, Banana आणि Biscuit सारखे 13 लोकप्रिय स्टिकर्स देण्यात आले आहेत. 

व्हॉट्सअॅपवर आता असा पाठवा निळ्या रंगात मेसेज

5. तुमच्या लिस्टमध्ये स्टिकर्स अॅड करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करा. येथे आणखी काही स्टिकर्स डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल. तसेच मोफत आणि पेड अशा दोन्ही स्टिकर्सबाबत येथे माहिती मिळेल. 

6. इमोजीची विंडो ओपन झाल्यावर सर्वात खाली इमोजी, जीआयएफ असे फिचर्स देण्यात आलेले आहेत, त्यामध्येच सर्वात शेवटचा पर्याय 'व्हॉट्स अॅप स्टिकर्स'चा देण्यात आला आहे. 

व्हॉट्सअॅप डिलीट न करता असे व्हा इनव्हिजिबल

7. तुम्हाला हवे असलेले स्टिकर्स फक्त अॅडच करता येत नाहीत तर ते डिलीटही करता येतात. तसेच व्हॉट्सअॅपच्या स्टिकर्स सेक्शनमध्ये तीन आयकॉन देण्यात आले आहेत. त्यामध्ये क्लॉक, स्टार आणि हार्ट आयकॉन आहेत. 

8. क्लॉक आयकॉनमध्ये आपण काही वेळाआधी वापरलेले स्टिकर्स असतात. तर स्टार आयकॉनमध्ये तुम्ही फेव्हरेटमध्ये अॅड केलेले स्टिकर्स असतात. तर हार्ट आयकॉनमध्ये चार कॅटेगरीमध्ये स्टिकर्स विभागले जातात. 

व्हॉट्सअॅपवर तुम्ही कोणासोबत सर्वाधिक बोलता? जाणून घ्या...!

9. स्टिकर्ससाठी अॅन्ड्रॉईडसाठी बीटा 2.18.329 आणि अॅपलसाठी 2.18.100 हे व्हर्जन डाऊनलोड करावे लागेल.  हे अपडेट केल्यानंतरच तुम्हाला यामध्ये नवीन व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा पर्याय उपलब्ध होईल. 

10. स्मार्टफोनमध्ये हे फीचर अपडेट केलेलं असेल तरच ते तुम्ही व्हॉट्सअॅप वेबवर वापरू शकता. व्हॉट्सअॅप वेबवर स्टिकर्स दिसत नसतील तर ब्राऊजरचा कॅचे डिलीट करावा आणि वेबपेज पुन्हा रिलोड करावे लागेल.

Web Title: whatsapp stickers spice up chats here is everything you need to know about this new feature in 10 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.