31 डिसेंबरपासून या स्मार्टफोनमधून बंद होणार व्हॉट्स अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 02:36 PM2017-12-26T14:36:51+5:302017-12-26T14:45:59+5:30
दैनंदिन आयुष्यात जर तुम्ही व्हॉट्स अॅपचा वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
नवी दिल्ली - दैनंदिन आयुष्यात जर तुम्ही व्हॉट्स अॅपचा वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण 31 डिसेंबर 2017पासून कित्येक मोबाइल फोनमध्ये व्हॉट्स अॅप (WhatsApp) काम करणं बंद करणार आहे. व्हॉट्स अॅप काही ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपला सपोर्ट बंद करत असल्याची माहिती समोर आली आहे. यूकेमधील वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्स अॅप (WhatsApp) या ओएससाठी सपोर्ट बंद करणार आहे.
या मोबाइलमधून व्हॉट्स अॅप होणार बंद
- ब्लॅकबेरी ओएस
- ब्लॅकबेरी 10,
- विडोंज 8.0
- विंडोज फोन 7
- आयफोन 3जीएस/आयओएस 6
- नोकिया एस40 (31 डिसेंबर 2018 पर्यंत)
- अँड्रॉइड 2.1 आणि अँड्रॉइड 2.2 (1 फेब्रुवारी 2020 पर्यंत)
या मोबाइल फोनमध्ये व्हॉट्सअॅपचे काही फीचर्स कधीही काम करणं बंद करू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये हे ऑपरेटिंग सिस्टम आहे तरी वेळीच फोन बदला कारण या फोनमध्ये व्हॉट्स अॅप काम करणार नाही.
काय आहे उपाय?
जर तुम्ही या ओएसचा वापर करत आहात तर तुमच्या मोबाइलमध्ये ओएस 4.0, आयओएस 7 आणि विंडोज 8.1 चे ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करावी. यानंतर तुम्ही व्हॉट्स अॅपचा वापर करू शकता.