व्हॉट्सअॅपच्या 'या' नवीन फिचरबद्दल तुम्हाला माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 01:14 PM2018-07-14T13:14:32+5:302018-07-14T13:15:05+5:30
आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवे फिचर्स आणणारे लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणखी एक भन्नाट फीचर आणणार आहे.
मुंबई - आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवे फिचर्स आणणारे लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आणखी एक भन्नाट फीचर आणणार आहे. फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅपर्फेने काही दिवसांपूर्वीच ग्रुप व्हिडीओ कॉलिंग, फॉरवर्डेड मेसेज यांसारखे काही नवीन फिचर्स लॉन्च केले होते. आता यात आणखी एक नवीन फिचरची भर पडणमार आहे. या फिचरला नाव 'mark as read' असे देण्यात आले आहे. सध्या या फिचरवर काम सुरू आहे.
माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, अॅन्ड्रॉइडसाठी व्हॉट्सअॅपच्या या नव्या फिचरची टेस्टिंग सुरू आहे. हे नवीन फिचर युजर नोटीफिकेशन बारमधूनच मेसेज 'mark as read' करू शकणार आहे त्यामुळे त्या मेसेजचे नोटिफिकेशन पुन्हा पुन्हा दिसणार नाहीत. हे नवीन फिचर लॉन्च करण्यामागील मुख्य हेतू हा यूजर्सचा वेळ वाचवणे हा आहे. कारण या फिचरमुळे यूजरला सतत व्हॉट्सअॅप ओपन करण्याची गरज भासणार नाही. अद्याप हे फिचर बीटा वर्जनवर लॉन्च झालेले नसून त्यावर काम सुरू आहे.
असे असणार फिचर -
असे सांगण्यात येत आहे की, या फिचरअंतर्गत 'mark as read'चा बॉक्स देण्यात येणार असून नोटिफिकेशन बारमध्ये रिप्लाय बॉक्सच्या बाजूलाच हा बॉक्स असणार आहे. याव्यतिरिक्त व्हॉट्सअॅप एका 'सस्पिशीअस लिंक' या फिचरवरही काम करत आहे. ज्याद्वारे युजरला कोणत्याही संशयित लिंकबाबत सुचित करण्यात येणार आहे.
फेक न्यूजवर आळा -
हे फिचर फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी तयार करण्यात येत आहे. यामुळे युजर्सला व्हॉट्सअॅपवर एकादी लिंक मिळाली तर त्या लिंकसंबधी पूर्ण माहिती जाणून घेऊन जर त्याबाबत काही संशयास्पद आढळले तर त्यासंदर्भात युजर्सना हे फिचर सुचित करणार आहे. व्हॉट्सअॅपला कोणतीही संशयास्पद लिंक आढळली तर त्या मेसेजसमोर लाल रंगाचे मार्क येईल. या लाल रंगाच्या मार्कमुळे हे समजणे शक्य होईल की, ही लिंक फेक लिंक आहे.