अरे वाह! WhatsApp वरील व्हॉइस मेसेज येणार वाचता; Voice Transcription बदलणार चॅटिंगचा अनुभव
By सिद्धेश जाधव | Published: September 13, 2021 02:59 PM2021-09-13T14:59:27+5:302021-09-13T14:59:35+5:30
WhatsApp New Feature: इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp व्हॉईस ट्रांसक्रिप्शन नावाच्या नव्या फीचरवर काम करत आहे. व्हॉईस डेटा फेसबुकसोबत शेयर केला जाणार नाही.
लोकप्रिय मेसेंजर WhatsApp चे नवीन फिचर लवकरच युजर्सच्या भेटीला नवीन फिचर घेऊन येणार आहे. या फिचरचे नाव व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन असे असेल. या फिचरच्या मदतीने युजरला आलेले व्हॉइस मेसेजेस टेक्स्टमध्ये रूपांतरित होतील. व्हॉट्सअॅपवरील या आगामी फिचरची माहिती WABetaInfo या वेबसाईटने दिली आहे.
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार इन्स्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp व्हॉईस ट्रांसक्रिप्शन नावाच्या नव्या फीचरवर काम करत आहे. या फिचरचा एक स्क्रिनशॉट देखील वेबसाईटने शेयर केला आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सना वॉयस मेसेजचा कंटेंट ट्रांसक्राइब करता येईल आणि व्हॉइस मेसेजचे टेक्स्ट स्वरूप नोटिफिकेशनमध्ये दिसेल. त्यामुळे तुम्हला व्हॉइस मेसेज ऐकण्याची गरज पडणार नाही. सध्या व्हॉईस ट्रांसक्रिप्शन फीचर iOS अॅपमध्ये स्पॉट दिसले आहे. व्हॉईस डेटा फेसबुकसोबत शेयर केला जाणार नाही तर व्हॉईस मेसेज Apple द्वारे ट्रांसक्राइब केले जातील, अशी माहिती WABetaInfo ने दिली आहे.
WhatsApp च्या लास्ट सीन फीचरमध्ये होणार मोठे बदल
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअॅप वर आता लास्ट सीनच्या सेटिंगमध्ये युजर्सना ‘My contacts except…’ असा एक नवीन ऑप्शन बघायला मिळेल. आता पर्यंत या प्रायव्हसी सेटिंगयामध्ये Everyone, My contacts आणि Nobody हे तीन पर्याय मिळत होते. व्हॉट्सअॅप लास्ट सीन सेटिंगमध्ये ‘My contacts except…’ ऑप्शन मिळाल्यानंतर युजर्स आपले व्हॉट्सअॅप लास्ट सीन कोणाला दाखवायचे आणि कोणाला नाही हे निवडू शकतात. सोप्प्या शब्दात सांगायचे तर तुम्ही व्हॉट्सअॅपवर कधी ऑनलाईन होता हे नको असलेल्या व्यक्तीपासून लपवू शकता, तर अगदी जवळच्या व्यक्तींना दाखवू शकता.