Whatsapp वर असा बनवा 'सीक्रेट ग्रुप'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 03:44 PM2019-07-24T15:44:51+5:302019-07-24T16:12:23+5:30
व्हॉट्सअॅपवर एक सीक्रेट ग्रुप तयार करून पर्सनल फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या लिंक आणि डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवता येणार आहे.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅपचा वापर हा व्हिडीओ, फोटो शेअर करण्यासाठी केला जातो. व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अॅप असून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र अनेकदा काही फोटो किंवा व्हिडीओ हे युजर्सना दुसऱ्यांना सेंड करायचे नसतात. तर स्वत: कडेच ठेवायचे असतात. यासाठी एक खास ट्रिक आहे. व्हॉट्सअॅपवर एक सीक्रेट ग्रुप तयार करून पर्सनल फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या लिंक आणि डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवता येणार आहे.
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅप देखील आपल्या युजर्सचं चॅट आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअॅपवर आपला सीक्रेट ग्रुप तयार करण्यासाठी काही मिनिटांसाठी कोणत्यातरी एका मित्राला आपल्या या नव्या ग्रुममध्ये सामील करावं लागेल. तुम्हाला हव्या असलेल्या नावाने एक नवा ग्रुप तयार करा. काही मिनिटांसाठी त्यामध्ये आपल्या एका मित्राला अॅड करा.
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ग्रुप इंफोमध्ये जा. यासाठी ग्रुपच्या वर देण्यात आलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. त्यामध्ये गेल्यावर आपल्या मित्राला त्या ग्रुपमधून रिमूव्ह करा. त्यानंतर त्या ग्रुपमध्ये केवळ तुम्हीच राहाल. म्हणजेच व्हॉट्सअॅपवरचा तुमचा सीक्रेट ग्रुप तयार झाला आहे. यामध्ये तुम्ही एकटेच असल्याने तुम्हाला हवे असलेले फोटो आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी सुरक्षित आहेत.
WhatsApp स्टेटसला फेसबुक स्टोरी बनवायचंय? मग 'या' स्टेप्स करतील मदत
Whatsapp वरचं खास चॅट लपवायचंय? कसं ते जाणून घ्या
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. व्हॉट्सअॅपवरीस काही चॅट्स हे खास असतात. ते कोणी पाहू नये असं नेहमी युजर्सना वाटत असतं. आयफोन युजर्सना चॅट लपवण्याची सुविधा ही देण्यात आली आहे. मात्र आता अँन्ड्रॉईड युजर्सना देखील चॅट लपवता येणार आहे. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा. चॅट स्क्रिनमध्ये तुम्हाला हवं असलेलं चॅट टॅप करा आणि प्रेस करा. आर्काइव्ह करायचं आहे त्या चॅटवर क्लिक करा. त्यानंतर आर्काइव्ह आयकॉन सिलेक्ट करा. चॅट आर्काइव्ह झाल्यानंतर नॉर्मल स्क्रिनवर ते दिसणार नाही. आर्काइव्ह चॅट्स हे चॅट स्क्रिनच्या खाली जाऊन अॅक्सेस करता येतं.
WhatsApp मेसेजचा कंटाळा आलाय? अकाऊंट डिलीट न करता व्हा 'Invisible'
डिलीट झालेले Whatsapp मेसेज वाचता येणार, जाणून घ्या कसं
व्हॉट्सअॅपवर सातत्याने मेसेज येत असतात. मात्र त्यातील काही मेसेज हे डिलीट केले जातात. हे डिलीट केलेल मेसेज वाचता येत नाहीत. पण काही ट्रिक्सचा वापर केल्यास हे मेसेज युजर्सना वाचता येतात. व्हॉट्सअॅपवर जे मेसेज डिलीट केले जातात ते फोनमध्ये स्टोर होतात. अॅपच्या रिकव्हरी फीचरच्या मदतीने हे मेसेज रिकव्हर केले जातात. चॅट हिस्ट्री ही व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवर स्टोर नसते. चॅट मेसेजचा बॅकअप असतो. तसेच ते वेगवेगळ्या ठिकाणी स्टोर केले जातात. जर चुकून रिसीव्ह केलेला मेसेज डिलीट केला तर तो सहजपणे व्हॉट्सअॅपच्या चॅट बॅकअप पर्यायमध्ये रिकव्हर केला जाऊ शकतो.
WhatsApp वर 'ही' ट्रिक वापरून खास मेसेज करा सेव्ह
Whatsapp वर नवीन फीचर येणार, फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड होणार
व्हॉट्सअॅप फोटो झटपट एडिट आणि फॉरवर्ड करण्यासाठी एक नवीन फीचर आणणार आहे. 'क्विक एडिट मीडिया शॉर्टकट' असं या फीचरचं नाव असून यामध्ये फोटो एडिट करता येणार आहे. विशेष म्हणजे युजर्सना रिसीव्ह सेंड करण्यात आलेले फोटो लगेचच एडिट करण्याची सुविधा देण्यात आली आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार 'क्विक एडिट मीडिया शॉर्टकट' हे फीचर पर्सनल आणि ग्रुप चॅटवर देखील काम करणार आहे. रिसीव्ह केलेला एखादा फोटो एडिट करून पुढे फॉरवर्ड करणं आता अधिक सोपं होणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन अपडेटमध्ये फोटो एडिट करण्याचा एक पर्याय मिळणार आहे. टेक्स्ट अॅड करण्यासोबतच इमेजसाठी डुडल आणि कॅप्शनपण यामुळे देता येणार आहे. एडिट करण्यात आलेला फोटो फोनमध्ये सेव्ह होणार नसून केवळ ओरिजनल फोटो सेव्ह होणार असल्याची माहिती रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.