मस्तच! नंबर सेव्ह न करताही अगदी सहज करता येणार WhatsApp मेसेज, जाणून घ्या नेमकं कसं?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 09:09 PM2021-12-06T21:09:49+5:302021-12-06T21:14:30+5:30
WhatsApp News : मेसेज करण्यासाठी आपण सर्वचजण आधी मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. मात्र, तुम्ही नंबर न सेव्ह करता देखील सहज WhatsApp च्या माध्यमातून मेसेज करू शकता. कसं ते जाणून घेऊया...
नवी दिल्ली - जगभरातील कोट्यावधी लोक चॅटिंगसाठी प्रामुख्याने WhatsApp चा वापर करतात. चॅटिंगसोबत महत्त्वाच्या फाईल्स, व्हिडिओ पाठवण्यासाठी WhatsApp चा उपयोग होतो. अॅपच्या माध्यमातून मेसेज करण्यासाठी आपण सर्वचजण आधी मोबाईलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. मात्र, तुम्ही नंबर न सेव्ह करता देखील सहज WhatsApp च्या माध्यमातून मेसेज करू शकता. कसं ते जाणून घेऊया...
नंबर सेव्ह न करता असा करू शकता WhatsApp मेसेज
- सर्वाप्रथम फोनवर वेब ब्राऊजर ओपन करा.
- त्यानंतर http://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx या लिंकला एड्रेस बारमध्ये पेस्ट करा.
- xxxxxxxxxx च्या जागी कंट्री कोड टाकून कॉन्टॅक्ट नंबर एंटर करा.
- आता फोनमध्ये एंटर बटणवर क्लिक करा.
- त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. ज्यावर हिरव्या रंगाचे मेसेज बटण दिसेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट व्हॉट्सअॅप ओपन होईल.
- येथून तुम्ही नंबर सेव्ह नसलेल्या व्यक्तीला थेट मेसेज करू शकता.
आयफोनवर 'या' स्टेप्स वापरूनही करू शकता मेसेज
- जर तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास, त्या नंबरला सेव्ह न करता मेसेज पाठवायचा असल्यास रीसेट कॉलमध्ये जाऊन आय बटणवर क्लिक करा.
- आता व्हिडिओ कॉल पर्यायावर टॅप करून व्हॉट्सअॅप निवडा.
- व्हिडिओ कॉल लागल्यानंतर त्वरित कट करा.
- आता व्हॉट्सअॅपवर जा.
- येथे उजव्या बाजूला असलेल्या आय बटणवर टॅप करून मेसेज आयकॉनवर क्लिक करा.
- आता नंबर सेव्ह न करता त्या व्यक्तीला मेसेज करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.