WhatsApp वापरताना मोबाईल डेटा वाचवायचाय?, "या" ट्रिक्स करतील मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 04:31 PM2021-01-24T16:31:56+5:302021-01-24T16:37:29+5:30
WhatsApp News : व्हॉट्सअॅपचा डेटा वाचवण्याच्या काही ट्रिक्स आहेत. त्या जाणून घेऊया.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. मात्र अनेकदा याचा वापर करताना मोबाईल डेटा लवकर संपतो अथवा जास्त वापरला जातो. व्हॉट्सअॅपचा वापर हा चॅट करण्यासाठी, व्हॉईस-व्हिडिओ कॉलिंगसाठी आणि मीडिया फाईल्स पाठवण्यासाठी हमखास केला जातो. व्हॉट्सअॅपचा डेटा वाचवण्याच्या काही ट्रिक्स आहेत. त्या जाणून घेऊया.
कॉल क्वॉलिटी
दररोज कितीतरी लोक आपल्याला व्हाईस किंवा व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेचा वापर करतात. मात्र कॉल करताना तुम्ही मोबाईल डेटा वाचवू शकता. पण त्यामध्ये कॉल क्वॉलिटी आधीसारखी नसणार आहे.
WhatsApp Tips and Tricks : "या" स्टेप्स करा फॉलो
- सर्वात आधी व्हॉट्सअॅपच्या सेटिंग ऑप्शनमध्ये जा.
- सेटिंग्समध्ये तुम्हाला स्टोरेज अँड डेटा पर्याय दिसेल.
- मीडिया ऑटो डाऊनलोड ऑप्शनवर यूज लेस डेटा फॉर कॉल्स हा पर्याय मिळेल. या फीचरला इनेबल करा.
Whatsapp मेसेज वाचला की नाही हे दर्शवणारी ब्लू टिकही नाही दिसणार, जाणून घ्या नेमकं कसं? https://t.co/3JMt6Kvet5#WhatsappStatus#WhatsApp#technology#WhatsappNewPolicy#WhatsAppPrivacyPolicy
— Lokmat (@MiLOKMAT) January 18, 2021
ऑटो-डाऊनलोड मीडिया फाईल्स
व्हॉट्सअॅपवर रिसीव्ह होणाऱ्या मीडिया फाईल्स ऑटो डाऊनलोड होण्याची शक्यता असते. ज्यामुळे डेटा जास्त जातो. तसेच स्टोरेज सुद्धा भरून जाते. हे दोन्ही वाचवायचं असेल तर ऑटो डाऊनलोड मीडिया फाईलला डिसेबल करा.
- सर्वप्रथम व्हॉट्सअॅप सेटिंग्समध्ये जा.
- सेटिंग्समध्ये तुम्हाला स्टोरेज अँड डेटा युसेज पर्याय मिळेल. यावर क्लिक करा.
- यानंतर मीडिया ऑटो डाउनलोड ऑप्शन मिळेल. या ठिकाणी सर्वात पहिला ऑप्शन When using Mobile Data दिसेल.
- तुम्ही मोबाईल डेटा ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर चार पर्याय दिसतील. फोटो, ऑडियो, व्हिडीओ आणि डॉक्यूमेंट. यात ज्या ऑप्शनवर तुम्ही बंद किंवा डिसेबर करू शकता त्या ऑप्शनवर क्लिक करा.
WhatsApp Web चा वापर करता? मग वेळीच व्हा सावध अन्यथा....https://t.co/z0ZtMjzlis#WhatsApp#WhatsappWeb#Technology
— Lokmat (@MiLOKMAT) January 19, 2021
चॅट बॅकअप
फोटो, व्हिडीओ आणि अन्य काहींचा बॅकअप घेणं गरजेचा आहे. बॅकअप दरम्यान डेटा जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार या फीचरला डिसेबल करू शकता.
- सर्वप्रथम तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅपच्या सेटिग्समध्ये जा.
- यानंतर चॅट पर्यायावर क्लिक करा.
- खाली बॅकअप ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करा. तुमच्या गरजेनुसार यावर क्लिक करू शकता. या फीचरला इनेबल किंवा डिसेबल करू शकता.
पार्ट टाईम जॉबच्या नावाने युजर्सना ओढतात जाळ्यात; "तो" मेसेज आल्यास वेळीच व्हा सावधhttps://t.co/lxgYsWCo8S#WhatsappPrivacy#WhatsApp#Hackers#hacking#Technology
— Lokmat (@MiLOKMAT) January 14, 2021