ग्रुप न करता WhatsAppवर एकाच वेळी 256 जणांना असा करा मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 09:19 AM2018-12-10T09:19:52+5:302018-12-10T09:33:53+5:30
WhatsAppवर आता ग्रुप तयार न करता एकाच वेळी तब्बल 256 जणांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तींना मेसेज पाठवायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे.
नवी दिल्ली - WhatsApp हे संवाद साधण्याचं लोकप्रिय माध्यम असल्याने त्याचा वापर मोठया प्रमाणावर केला जात आहे. WhatsApp वरील चॅटची गंमत वाढवण्यासाठी कंपनी नेहमीच युजर्ससाठी मजेशीर फीचर्स आणत असते. मित्रमैत्रिणी, नातेवाईक, ऑफीस किंवा सोसायटीतील मंडळींशी एकत्रितपणे संवाद साधता यावा यासाठी WhatsApp वर अनेक ग्रुप तयार केले जातात. मात्र प्रत्येकवेळी ग्रुपवरती चॅट करणं आणि सर्वांना रिप्लाय करणं शक्य होतंच असं नाही.
WhatsApp ग्रुपवरील मेसेजचा कधीकधी इतका कंटाळा येतो की आपण तो ग्रुपच डिलीट करतो. WhatsApp वर आता ग्रुप तयार न करता एकाच वेळी तब्बल 256 जणांना मेसेज पाठवणे शक्य होणार आहे. यासाठी तुम्हाला ज्या व्यक्तींना मेसेज पाठवायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह असणं गरजेचं आहे. ग्रुप तयार न करता 256 जणांना ब्रॉडकास्ट लिस्टच्या मदतीने कसा मेसेज पाठवायचा हे जाणून घेऊया.
- सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये WhatsApp ओपन करा.
- ओपन केल्यावर उजव्या बाजूला तीन डॉटवर क्लिक करा.
- क्लिक केल्यावर अनेक पर्याय दिसताल. त्यामध्ये New Broadcast या पर्यायवर क्लिक करा.
- तुम्हाला ज्या लोकांना मेसेज पाठवायचा आहे ते सर्व कॉन्टॅक्ट सिलेक्ट करा.
- जेव्हा तुमची लिस्ट पूर्ण होईल तेव्हा ग्रीन टीकवर क्लिक करा.
- संपूर्ण प्रकियेनंतर तुमच्याकडे एक लिस्ट तयार झाली आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही सर्व लोकांना एकाच वेळी हवा तो मेसेज पाठवू शकता.