सावधान! WhatsApp ची 'ही' सेटिंग सुरू असेल तर हॅक होऊ शकतो फोन; 'असं' करा संरक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 02:37 PM2023-12-29T14:37:22+5:302023-12-29T14:54:00+5:30
हॅकर्स याचा फायदा कसा घेऊ शकतात हे सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे. बर्याच प्रकरणांमध्ये हॅकर्स इमेजमध्ये लपवलेले मालवेअर पाठवतात.
लोकांना अडकवण्यासाठी हॅकर्स विविध पद्धती वापरतात. अशीच एक पद्धत WhatsApp च्या सेटिंगद्वारे त्यांनी शोधली आहे. WhatsApp वर असे अनेक फीचर्स आहेत जे डिफॉल्ट म्हणून ऑन असतात. हे फीचर्स फक्त तुमचा अधिक डेटा वापरत नाहीत तर तुमच्यासाठी धोकादायक देखील ठरू शकतात.
असंच एक फीचर म्हणजे WhatsApp मीडिया ऑटो डाउनलोड. या फीचरच्या मदतीने तुमच्या WhatsApp वर येणारा मीडिया ऑटोमेटिक डाउनलोड होतो. हे फीचर डीफॉल्टमधून ऑन असतं. यामध्ये तुम्हाला फोटो, व्हिडीओ, ऑडिओ आणि डॉक्युमेंट्सचे पर्याय मिळतात. तुम्ही हे सेट करू शकता.
हॅकर्स याचा फायदा कसा घेऊ शकतात हे सर्वप्रथम आपण समजून घेतले पाहिजे. बर्याच प्रकरणांमध्ये हॅकर्स इमेजमध्ये लपवलेले मालवेअर पाठवतात. कोणीतरी हे फोटो, डॉक्यूमेंट्स किंवा फाइल्स डाउनलोड करतं. हॅकर्स फोन हॅक करतात. डिफॉल्ट सेटिंगमध्ये हा सर्व मीडिया ऑटो डाउनलोडवर असतो. अशा परिस्थितीत हॅकर्स तुमच्या फोनमध्ये सहज घुसू शकतात.
तुम्ही हे सेटिंग बंद केलं तर बरं होईल. यासाठी तुम्हाला WhatsApp सेटिंगमध्ये जावे लागेल. येथे तुम्ही सर्व सेटिंग्ज मॅन्युअलवर सेट करू शकता. यासाठी तुम्हाला मीडिया डाउनलोड लिस्टमधील सर्व पर्याय अनचेक करावे लागतील. अनचेक केल्यानंतर, फक्त तुम्ही डाउनलोड केलेला मीडिया डाउनलोड केला जाईल. कोणताही मीडिया आपोआप डाउनलोड होणार नाही आणि हॅकर्सना संधी मिळणार नाही.