कोणाचेही WhatsApp मेसेज वाचा त्यांच्या न कळत; वापरा 'ही' सोप्पी ट्रिक 

By सिद्धेश जाधव | Published: June 29, 2021 06:35 PM2021-06-29T18:35:24+5:302021-06-29T18:37:32+5:30

Whatsaap Tip Trick: वेब व्हाॅट्सअ‍ॅप फीचरचा वापर करून तुम्ही एकाच फोनमध्ये दोन व्हाॅट्सअ‍ॅप अकॉउंट वापरू शकता.

Whatsapp tricks know how to read others message without knowing others  | कोणाचेही WhatsApp मेसेज वाचा त्यांच्या न कळत; वापरा 'ही' सोप्पी ट्रिक 

कोणाचेही WhatsApp मेसेज वाचा त्यांच्या न कळत; वापरा 'ही' सोप्पी ट्रिक 

Next

भारतातील लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp मध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत. तसेच कंपनी वारंवार नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. लवकरच व्हाॅट्सअ‍ॅपमध्ये मल्टी डिवाइस सपोर्ट येणार आहे, ज्याचा वापर करून एक व्हाॅट्सअ‍ॅप नंबर 5 डिवाइसेसमध्ये वापरता येईल. पण एक ट्रिक अशी आहे जी वापरून तुम्ही एकाच डिवाइसमध्ये दोन नंबरचे व्हाॅट्सअ‍ॅप अकाउंट वापरू शकता.  

ही ट्रिक वापरून तुम्ही एखाद्याच्या न कळत त्यांचे व्हाॅट्सअ‍ॅप मेसेजेस देखील वाचू शकता. विशेष म्हणजे या ट्रिकसाठी कोणताही थर्ड पार्टी अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.  

असे वाचा कोणाचेही व्हाॅट्सअ‍ॅप मेसेजेस 

  1. सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये वेब ब्राउजर ओपन करा आणि web.whatsapp.com वर जा. 
  2. तुम्ही व्हाॅट्सअ‍ॅपच्या होम पेजवर पोहोचाल. आता उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्सवर टॅप करून ब्राउजर मेनू उघडा. 
  3. त्यानंतर ‘Request desktop site’ वर क्लिक करा. 
  4. यानंतर तुम्हाला QR कोड मिळेल. 
  5. ज्या अकॉउंटचे व्हाॅट्सअ‍ॅप मेसेजेस वाचायचे आहेत त्या फोनमधील व्हाॅट्सअ‍ॅपमधील Settings मध्ये जाऊन WhatsApp Web सिलेक्ट करा. फोनचा कॅमेरा ओपन होईल.
  6. आता तुमच्या फोनच्या वेब ब्राउजरमधील QR कोड स्कॅन करा. तुमच्या फोनमध्ये दुसऱ्या नंबरचा व्हाॅट्सअ‍ॅप अकॉउंट लॉगिन होईल.  

Web Title: Whatsapp tricks know how to read others message without knowing others 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.