WhatsApp मध्ये आता ट्विटर स्पेससारखं फिचर येणार; असं करा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 11:13 AM2023-08-09T11:13:23+5:302023-08-09T11:17:31+5:30
WhatsApp नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवे फिचर लाँच करत असते.
व्हॉट्स अॅप नेहमी आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन फिचर लाँच करत असते. आता आणखी एक फिचर सुरू केलं आहे, व्हॉट्स अॅप वापरकर्त्यांना ट्विटरसारखीच स्पेस घेता येणार आहे. ३२ वापरकर्ते एकत्रित ऑडियो सेशन घेऊ शकतात. याअगोदर कंपनीने व्हिडीओ फिचर सुरू केलं होतं, पण वापरकर्ते हे फिचर वापरत असताना कॅमेरा बंद ठेवत होते. यात फसवणुकीच्या घटनाही समोर आल्या होत्या.
सावधान! व्हॉट्स अॅपमध्ये मोठा बग, कोणाचेही स्टेट्स गुपचूप पाहिले जाऊ शकते
व्हॉट्स अॅपच्या बीट व्हर्जनमध्ये आता नवे फिचर लाँच झाले आहे. यात एकाचवेळी ३२ वापरकर्ते लाईव्ह सेशनमध्ये जॉईन होऊ शकतात. बीटा व्हर्जन 2.23.16.19 यावर अनेक वापरकर्त्यांना हे फिचर मिळाले आहे. यावरुन ऑडियो सेशनचे आयोजन करता येऊ शकते.
ज्या वापरकर्त्यांना WhatsApp चे नवीन फिचर फीचर मिळाले आहे त्यांना ग्रुप चॅटमध्ये वेव्हफॉर्म आयकॉन आयकॉन मिळेल. जर तुम्हाला त्याचे अपडेट मिळाले असेल आणि ते त्या ग्रुपशी कंपेटेबल असेल तरच हे चिन्ह दिसेल.
वेव्ह आयकॉनवर क्लिक करून वापरकर्ते सहजपणे ग्रुप कॉल सेशन आयोजित करू शकतात. या सेशनमध्ये जास्तीत जास्त ३२ वापरकर्ते जॉईन होई शकतात. इतर ग्रुपप्रमाणे, या फिचरमुळे ग्रुपमध्ये उपस्थित असलेल्या प्रत्येक वापरकर्त्याचा फोन वाजणार नाही. सत्र बंद झाले नसले तरी ते 1 तासानंतर आपोआप बंद होईल.
ऑडियोचे हे फिचर अगोदरपासूनच टेलिग्राममध्ये होतं. टेलिग्रामने व्हाईस ग्रुप चॅट फिचर २०२० या वर्षीच लाँच केले आहे.