WhatsApp वर आता प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही, 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 10:59 AM2019-06-03T10:59:44+5:302019-06-03T11:12:53+5:30
व्हॉट्सअॅप देखील आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि मनोरंजनासाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता व्हॉट्सअॅप युजर्सना प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. व्हॉट्सअॅप देखील आपल्या युजर्सच्या सुरक्षिततेसाठी आणि मनोरंजनासाठी नवनवीन फीचर आणत असतं. मात्र आता व्हॉट्सअॅप युजर्सना प्रोफाईल फोटो डाऊनलोड करता येणार नाही. कारण व्हॉट्सअॅप लवकरच सेव्ह आणि अनसेव्ह कॉन्टॅक्टचं प्रोफाईल फोटो डाऊनलोड करण्याचा पर्याय हटवणार आहे.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप अल्बम ले-आऊट आणि ऑडिओ फॉरमॅटमध्ये बदल करणारं फीचर आणणार आहे. व्हॉट्सअॅपमध्ये प्रोफाईल फोटो सेव्ह करण्याची सोय होती. मात्र आता युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन हे फीचर काढण्यात येणार आहे. व्हॉट्सअॅपने कॉन्टॅक्टसचे प्रोफाईल फोटो कॉपी किंवा शेअर करण्यावर निर्बंध लावले आहेत. पण युजर्सना व्हॉट्सअॅपवर असलेल्या अनेक ग्रुपचे फोटो डाऊनलोड अथवा शेअर करता येणार आहेत.
व्हॉट्सअॅपच्या नव्या iOS बीटा व्हर्जनमध्ये चॅटमध्ये दिसणारा इमेज अल्बम अधिक चांगला दिसणार आहे. तसेच एकाचवेळी खूप फोटो पाठवले असतील तर त्याचा अल्बम तयार होऊन तो डाऊनलोड करणं शक्य होणार आहे. त्यातील फोटोंची संख्या ही दिसणार आहे. व्हॉट्सअॅपवरील ऑडिओसाठी वापरलं जाणारं opus फॉरमेट बदलून त्याजागी (M4A) एमफोरए हा फॉरमॅट वापरण्यात येणार आहे. यासोबतच आणखी काही छोटे बदल या अपडेटमध्ये करण्यात येणार आहेत.
आता WhatsApp वरही जाहिराती दिसणार
सोशल मीडियामध्ये अनेक ठिकाणी जाहिराती दिसत होत्या. पण आतापर्यंत व्हॉट्सअॅपवर जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या. 2020 पासून व्हॉट्सअॅपवर जाहिराती दिसणार असल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. नेदरलँडमध्ये दरवर्षी होणाऱ्या मार्केटींग समिटमध्ये फेसबुकने 2020 मध्ये व्हॉट्सअॅपवर जाहिराती दिसण्यास सुरुवात होईल अशी माहिती दिली आहे. सुरुवातीला व्हॉट्सअॅप स्टोरी स्टेक्शनमध्ये या जाहिराती दाखवण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. याचा एक डेमो देखील दाखवण्यात आला. यामध्ये जाहिरात ही पूर्ण स्क्रीन दिसणार असून त्यामध्ये एक लिंक देण्यात येईल. हे स्वाईप केल्यावर युजर्स डायरेक्ट त्या लिंकवर जाऊ शकतात. सध्या अशा जाहिराती इन्स्टाग्रामवर दिसत आहेत तर व्हॉट्सअॅपही लवकरच यावर काम करत आहे.
जाणून घ्या WhatsApp चे 9 सिक्रेट्स; वाढेल चॅटिंगचा आनंद
फक्त एक सेटींग बदला, WhatsApp वर ऑटो सेव्ह होणार नाहीत फोटो
WhatsApp हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअॅपच्या मदतीने फोटो, व्हिडीओ, ऑडीओ, डॉक्यूमेंट्स शेअर करता येतात. व्हॉट्सअॅपच्या अनेक ग्रुपमध्ये युजर्स अॅड असतात. त्या ग्रुपमध्ये सातत्याने मेसेज, फोटो अथवा व्हिडीओ हे येत असतात. मात्र हे फोटो स्मार्टफोनच्या गॅलरीमध्ये ऑटो सेव्ह होतात. आपोआप सेव्ह झालेल्या गोष्टींमुळे फोनची मेमरी लवकर भरते. तसेच युजर्सना ही नको असलेले फोटो डिलीट करावे लागतात. व्हॉट्सअॅपवर आपोआप सेव्ह होणारे हे व्हिडीओ आणि फोटो अनेकदा युजर्सना नको असतात. मात्र या समस्येने ग्रस्त असलेल्या युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. स्मार्टफोनमध्ये फक्त एक सेटींग बदलून या समस्येपासून त्यांची सुटका होणार आहे. यामुळे आपोआप फोटो अथवा व्हिडीओ फोनमध्ये सेव्ह होणार नाहीत. अँड्रॉईड स्मार्टफोन आणि आयफोनमध्ये सेटींग बदलून असे करता येणार आहे.
WhatsApp वर आलं नवं फीचर; नोटीफिकेशनमध्ये दिसणार स्टीकर्स
स्क्रीनशॉट न घेता असं सेव्ह करा WhatsApp स्टेटस
इन्संट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. व्हॉट्सअॅपचं स्टेटस फीचर अत्यंत लोकप्रिय झालं असून युजर्सच्या ते आवडीचं आहे. या फीचरच्या मदतीने एखाद्या लिंकपासून ते व्हिडीओ, मीम्स, फोटो, हॉलीडे डेस्टीनेशनसारख्या सर्व गोष्टी शेअर करता येतात. यातील अनेक स्टेटस हे हवे असल्याने ते सेव्ह करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये स्क्रीनशॉट काढला जातो. मेसेजिंग अॅपमध्ये स्टेटस सेव्ह करण्याचा कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही. मात्र हे स्टेटस सेव्ह करण्यासाठी काही ट्रिक्स आहेत.
सावधान! एक WhatsApp कॉल उडवणार सर्व डेटा; असा करा बचाव
व्हॉट्सअॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम असल्याने अनेक जण त्याचा वापर करत असतात. व्हॉट्सअॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअॅप अपडेट करण्याची अनेकदा माहिती मिळते. मात्र युजर्स ती गोष्ट टाळतात. पण युजर्सची ही एक छोटीशी चूक त्यांना महागात पडू शकते. त्वरीत व्हॉट्सअॅप अपडेट करा कारण व्हॉट्सअॅपमध्ये एक बग सापडला आहे. Whatsapp कॉलच्या माध्यमातून हा बग स्पायवेअर इन्स्टॉल करण्याची परवानगी देतो. म्हणजेच स्मार्टफोनवर येणारा एखादा कॉल देखील धोकादायक ठरणार आहे. मग तो कॉल युजर्सने केला असेल अथवा युजर्सने तो रिसीव्ह केला असेल तरी त्याचा फटका बसणार आहे. फोनमधील सर्व डेटा, कॉल लॉग, ईमेल, मेसेज, फोटो, व्हिडीओ या सर्व गोष्टी बगमुळे डिलीट होऊ शकतात.