Whatsapp वर नवं फीचर येणार, व्हिडीओ कॉलिंगची मजा आणखी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 10:05 AM2019-09-10T10:05:55+5:302019-09-10T10:24:07+5:30

गुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं.

whatsapp user can now make video call directly by giving command to google assistant | Whatsapp वर नवं फीचर येणार, व्हिडीओ कॉलिंगची मजा आणखी वाढणार

Whatsapp वर नवं फीचर येणार, व्हिडीओ कॉलिंगची मजा आणखी वाढणार

googlenewsNext
ठळक मुद्देयुजर्स गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकणार आहेत. युजर्स 'Hey Google' सोबत 'Whatsapp Video ( कॉल करायचा आहे त्या कॉन्टॅक्टचं नाव)' सांगून लवकरच व्हिडीओ कॉल करू शकणार फक्त अँड्रॉईडसाठी फीचर रोलआऊट करण्यात आले.

नवी दिल्ली - गुगलचं लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप देखील आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. कारण व्हॉट्सअ‍ॅपने युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं या उद्देशाने नवं फीचर आणलं आहे. लवकरच युजर्स गुगल असिस्टेंटच्या माध्यमातून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करू शकणार आहेत. 

गुगल असिस्टेंट थर्ड पार्टी चॅटिंग अ‍ॅपच्या मदतीने मेसेज सेंड करण्याची सुविधा देतं. मात्र युजर्स यावरून व्हिडीओ कॉल करू शकत नव्हते. पण आता ते शक्य होणार आहे. गुगल असिस्टेंटवरून व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल हे फीचर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे युजर्स 'Hey Google' सोबत 'Whatsapp Video ( कॉल करायचा आहे त्या कॉन्टॅक्टचं नाव)' सांगून लवकरच व्हिडीओ कॉल करू शकणार आहेत. 

गुगल असिस्टेंटचे प्रोडक्ट मॅनेजर क्रिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, असिस्टेंट सुरुवातीपासूनच लोकप्रिय मेसेजिंग सर्व्हिससोबत काम करतं. त्यामुळे युजर्स मेसेज पाठवू शकतात तसेच वाचू शकतात. मात्र आता लवकरच युजर्स असिस्टेंटच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅपवरून फ्री ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल करू शकतात. त्यासाठी फक्त गुगल व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओसोबत कॉन्टॅक्टचं नाव सांगायचं आहे. हे फीचर फक्त अँड्रॉईडसाठी रोलआऊट करण्यात आले आहे. आयफोन्ससाठी हे फीचर अद्याप देण्यात आलेले नाही.

Whatsapp वर कोणासोबत किती चॅटिंग केलं?; आता सर्वच समजणार!

Whatsappच्या 'या' नवीन फीचरमध्ये येणार फिंगरप्रिंट लॉक

व्हॉट्सअ‍ॅप कंपनी युजर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येते. त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅप बीटामध्ये  फिंगरप्रिंट लॉक हे फीचर्स वापरता येणार आहे. त्यामुळे हे नवीन फीचर्स सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार आहे. या संबंधीत माहिती WABetaInfoने ट्विट करत दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जन  2.19.221 मध्ये हे नवीन फिंगरप्रिंट लॅाकची सुविधा उपलब्ध असणार आहे. तसेच हे व्हर्जन उपलब्ध झाल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सेटिंगच्या प्रायव्हसीमध्ये जाऊन 'ऑथेंटिकेशन' चे नवीन ऑप्शन उपलब्ध होईल. यानंतर युजर्स आपले फिंगर प्रिंट रजिस्टर करू शकणार आहे.

technology whatsapp latest upcoming features | खूशखबर! WhatsApp वर लवकरच

खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार

'ही' चूक पडेल महागात; WhatsApp करेल टेम्पररी ब्लॉक

- व्हॉट्सअ‍ॅपच्या काही अटी आणि नियम पाळले नाहीत तर काही वेळ युजर्सना ब्लॉक केलं जाऊ शकतं. 

- व्हॉट्सअ‍ॅपचे थर्ड पार्टी अ‍ॅप GB WhatsApp आणि WhatsApp Plus चा वापर केल्यास व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना टेम्पररी बॅन करतं. 

- युजर्स या दोन्ही अ‍ॅपपैकी कोणत्या अ‍ॅपचा वापर करत असतील तर त्यांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या नियमांमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे.

 - व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (FAQ) पेजवर याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये हे दोन्ही अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपचे ऑफिशिअल व्हर्जन नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

- थर्ड पार्टी अ‍ॅप असून ते व्हॉट्सअ‍ॅपच्या अनेक नियमांचं उल्लंघन करतात. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅप यांचा वापर करणाऱ्या युजर्सना टेम्पररी ब्लॉक करतं. 

- जर कोणत्याही युजरला अ‍ॅपमध्ये ‘Temporarily banned’ असा मेसेज आला तर युजर्स ऑफिशिअल व्हॉट्सअ‍ॅप ऐवजी अनसपोर्टेड व्हर्जनचा वापर करत आहेत. 

 

Web Title: whatsapp user can now make video call directly by giving command to google assistant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.