व्हॉट्सअप युजरला धाकड अपडेट! फोटो क्वालिटी लॉसचा प्रश्नच मिटला; असे HD मध्ये फोटो पाठवा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 12:24 PM2023-08-18T12:24:23+5:302023-08-18T12:38:29+5:30

How to send HD Photos in Whatsapp: अनेकजण जे बिटा टेस्टर आहेत त्यांना ही अपडेट कधीचीच मिळालेली आहे. त्यांच्या अनुभवानुसार एचडी क्वालिटीमध्ये फोटो पाठविता येतात.

Whatsapp user updated! The problem of photo quality loss is solved; Send such photos in HD | व्हॉट्सअप युजरला धाकड अपडेट! फोटो क्वालिटी लॉसचा प्रश्नच मिटला; असे HD मध्ये फोटो पाठवा

व्हॉट्सअप युजरला धाकड अपडेट! फोटो क्वालिटी लॉसचा प्रश्नच मिटला; असे HD मध्ये फोटो पाठवा

googlenewsNext

व्हॉट्सअपवर कोणाला फोटो पाठवायचे झाल्यास त्यांची क्वालिटी खराब होत होती किंवा ते फाईल म्हणून शोधून शोधून पाठवावे लागत होते. आता हा त्रास वाचणार आहे, शिवाय एचडी क्वालिटीचे फोटो तुम्हाला पाठविता येणार आहेत. 

WhatsApp लवकरच नवीन अपडेट देणार आहे. अनेकजण जे बिटा टेस्टर आहेत त्यांना ही अपडेट कधीचीच मिळालेली आहे. त्यांच्या अनुभवानुसार एचडी क्वालिटीमध्ये फोटो पाठविता येतात. हे फोटो १६००x१२०० पिक्सल या स्टँडर्ड आणि एचडी ४०९६x३०७२ पिक्सल साईडमध्ये पाठविता येत आहेत. 

या साईजचे फोटो पाठविताना ते जास्त स्पीडचे इंटरनेट आणि पाठविलेल्या व्यक्तीच्या व तुमच्या फोनमधील जास्त साईज घेणार आहे. यामुळे तुम्हाला स्टोरेज स्पेसची समस्या येऊ शकते. परंतू, ही मागणी केल्या अनेक काळापासून केली जात होती. ती आता पूर्ण होणार आहे. यामुळे कामाचे फोटो असतील किंवा ग्रुपचे, पिकनिकचे फोटो असतील ते तुम्हाला चांगल्या क्वालिटीमध्ये मिळणार आहेत. 

मेटा सीईओ मार्क झकरबर्गनी नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. व्हॉट्सअॅपला फोटो शेअरिंगसाठी एक मोठे अपडेट मिळाले आहे. या अंतर्गत तुम्ही एचडीमध्ये फोटो पाठवू शकता. फेसबुक पोस्टमध्ये एचडी किंवा मानक गुणवत्तेत फोटो कसे पाठवायचे हे दर्शविणारा व्हिडिओ देखील समाविष्ट आहे. यासाठी तुम्ही फोटो अपलोड करता तेव्हा वरच्या बाजूला पेन आणि क्रॉप टूल असते. त्याच बरोबरीने एक HD पर्याय असेल. त्यावर क्लिक करून तुम्ही HD मध्ये फोटो पाठवू शकणार आहात. 

य़ाचबरोबर जर तुमच्याकडे कमी बँडविड्थ कनेक्टिव्हिटी असताना तुम्हाला एखादा फोटो आला तर तुम्ही तो फोटो कोणत्या व्हर्जनमध्ये ठेवू इच्छिता ते निवडू शकणार आहात. व्हॉट्सअॅपचे म्हणणे आहे की एचडी फोटो अपडेट येत्या काही आठवड्यांत जागतिक स्तरावर उपलब्ध होईल. या महिन्याच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉल दरम्यान स्क्रीन-शेअरिंग फीचरची घोषणा केली होती. 

Web Title: Whatsapp user updated! The problem of photo quality loss is solved; Send such photos in HD

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.