Shocking! 50 कोटी युजर्सचे WhatsApp फोन नंबर Leak; पाहा तुमचाही नंबर आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 10:44 AM2022-11-28T10:44:49+5:302022-11-28T10:45:19+5:30
WhatsApp : जवळपास 50 कोटी युजर्सचे व्हॉट्सअॅप फोन नंबर चोरीला गेले आहेत आणि ते ऑनलाइन विकले जात आहेत.
सध्या सर्वत्र सोशल मीडियात व्हॉट्सअॅपचा (WhatsApp) मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. व्हॉट्सअॅपवर जवळपास 200 कोटी युजर्स आहेत. मात्र डेटा आणि प्रायव्हसीमुळे व्हॉट्सअॅप पुन्हा अडचणीत आले आहे. एका बातमीने व्हॉट्सअॅप युजर्सना मोठा धक्का दिला आहे. जवळपास 50 कोटी युजर्सचे व्हॉट्सअॅप फोन नंबर चोरीला गेले आहेत आणि ते ऑनलाइन विकले जात आहेत.
चोरलेले नंबर एका प्रसिद्ध हॅकिंग कम्युनिटी फोरमवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सायबरन्यूजच्या ( CyberNews) वृत्तानुसार, डेटासेटमध्ये 84 देशांमधील व्हॉट्सअॅप युजर्स डेटा आणि यूएसमधील 32 दशलक्षाहून अधिक युजर्सचे फोन नंबर, यूकेचे 11 दशलक्ष आणि रशियाचे 10 दशलक्ष फोन नंबर सामील आहेत.
हॅकर्सनी इजिप्त (45 मिलियन), इटली (35 मिलियन), सौदी अरेबिया (29 मिलियन), फ्रान्स (20 मिलियन) आणि तुर्की (20 मिलियन) या देशांतील नागरिकांचे महत्त्वपूर्ण फोन नंबर असल्याचा दावा केला आहे. रिपोर्टनुसार, हॅकर्स यूएस डेटासेटला 7,000 डॉलर ( 5,72,481 रुपये), यूकेला 2,500 डॉलर (2,04,457 रुपये) आणि जर्मनीला 2,000 डॉलर (1,63,566 रुपये) मध्ये विकत आहे.
सायबर न्यूजच्या रिसर्चर्सनी हॅकर्सशी संपर्क साधला आहे. त्यांना हॅकर्सद्वारे एक सॅम्पल शेअर केला आहे. सॅम्पलमध्ये 1,097 यूके आणि 817 यूएसचे नंबर आहेत. रिसर्चर्सनी तपासले असता यामध्ये आढळले की, सर्व नंबर अॅक्टिव्ह युजर्सचे आहेत. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, हॅकर्सनी हा डेटा कसा मिळवला हे सांगितले नाही. फक्त हॅकर्स सांगितले की, 'आपल्या रणनीतीचा वापर केला'.
दरम्यान, सर्व नंबर व्हॉट्सअॅप युजर्सचे आहेत. डेटा चोरीचा अर्थ हॅकर्स स्पॅमिंग, फिशिंग, आयडेन्टीची चोरी किंवा इतर कोणत्याही सायबर गुन्ह्यांसाठी हे नंबर वापरू शकतात. दरम्यान, व्हॉट्सअॅप अनेक प्रायव्हसी सेटिंग्ज प्रोव्हाइड करते, जसे की स्टेटस लपवणे आणि प्रोफाइलचा फोटो लपवणे.