आता तुमची सिक्रेट WhatsApp चॅटिंग राहणार कायम सिक्रेट; Archived Chat साठी नवीन फिचर सादर
By सिद्धेश जाधव | Published: July 28, 2021 07:36 PM2021-07-28T19:36:02+5:302021-07-28T19:37:16+5:30
WhatsApp ने नवीन अर्काइव्ह चॅट सेटिंग फीचर रोल आउट केले आहे. या नवीन फीचरमुळे आता आर्काइव्ड चॅट्स म्यूट करता येतील.
WhatsApp ने युजर्ससाठी नवीन आर्काइव्ड चॅट सेटिंग फीचर रोल आउट केले आहे. या नवीन फीचरचा वापर करून युजर्सना त्यांच्या आर्काइव्ड चॅट्स म्यूट करता येतील. म्हणजे आर्काइव्ड चॅटमध्ये नवीन मेसेज आल्यावर देखील तो पॉप-अप होणार नाही. जोपर्यंत तुम्ही आर्काइव्ड चॅट्स अनआर्काइव्ड करत नाही तोपर्यंत त्यांची नोटिफिकेशन येणार नाही. (whatsapp updates archived chat feature with new setting)
WhatsApp वरील हे फीचर iOS आणि Android युजर्ससाठी रोल आउट करण्यात आले आहे. हे फीचर वापरण्यासाठी WhatsApp चे लेटेस्ट व्हर्जन इंस्टॉल करणे आवश्यक आहे. या नवीन फीचरचा फायदा असा होईल कि आवश्यक चॅट्स वर दिसतील तर अनावश्यक चॅट्स आर्काइव्ड करून तळाला पाठवता येतील. जे लोक अर्काइव्ह चॅट फिचरचा वापर चॅट लपवण्यासाठी करतात त्यांना पण वारंवार चॅट्स अर्काइव्ह कराव्या लागणार नाहीत.
हे फिचर अशा प्रकारे करा अनेबल
- हे अनेबल किंवा डिसेबल करण्यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये जा.
- त्यानंतर सेटिंग्समधून चॅट सेटिंग्सची निवड करा.
- चॅट सेटिंग्समध्ये आर्काइव्ड चॅट्स अनेबल आणि डिसेबल करण्याचा पर्याय दिसेल.
- टोगॅल ऑन केल्यावर तुम्ही हे नवीन फीचर वापरू शकाल.
चॅटिंग आर्काइव्ड (Archived) आणि Un-archived कशी करायची
- कोणतीही वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट आर्काइव्ड करण्यासाठी त्या चॅट किंवा ग्रुप चॅटवर टच करून होल्ड करा.
- आता वर पिन, रिमूव, म्यूट आणि आर्काइव्ड असे पर्याय येतील, त्यातून आर्काइव्डची निवड करा.
- आता ती चॅट मेन चॅट लिस्ट मधून गायब होईल.
- अनआर्काइव करण्यासाठी ती चॅट नावाने सर्च करा.
- उजवीकडे असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून अनम्यूट नोटिफिकेशन ऑप्शन निवडा.