नंबरचं नो टेन्शन! WhatsApp ने आणलं कमाल फीचर; चॅटिंग करताना येणार नाही '1234' चा प्रॉब्लेम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 01:56 PM2024-02-06T13:56:22+5:302024-02-06T14:05:24+5:30
WhatsApp वर यापुढेही अनेक नवीन फीचर्स येणार आहेत. अशाच एका दमदार फीचर्सबाबत जाणून घेऊया...
WhatsApp नेहमीच आपल्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन फीचर्स आणत असतं. ज्यामुळे युजर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो. यामुळेच WhatsApp हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. WhatsApp वर यापुढेही अनेक नवीन फीचर्स येणार आहेत. अशाच एका दमदार फीचर्सबाबत जाणून घेऊया...
WhatsApp मध्ये एक कमाल फीचर आलं असून या फीचरला नंबर लिस्ट फीचर असं म्हणतात. WhatsApp चॅट दरम्यान, जर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तीन-चार किंवा त्याहून अधिक ओळींमध्ये लिहायच्या असतील, तर तुम्हाला प्रत्येक ओळीच्या आधी एक नंबर टाकून पुढे जावं लागायचं. पण आता असं होणार नाही. आता जर तुम्ही पहिल्या ओळीच्या पुढे नंबर-1 टाकला आणि नंतर काही लिहिल्यानंतर, स्पेसवर क्लिक केलं आणि पुढील ओळ लिहायला गेल्यास, नंबर-2 आपोआप तिथे दिसेल.
ओळ संपवून पुढे गेलो तर नंबर 3 येईल. अशा प्रकारे, विंडोजमध्ये टाइप करताना WhatsApp वर नंबर लिस्ट आपोआप काम करेल. याशिवाय WhatsApp वर तुम्हाला एखाद्या गोष्टीसमोर बुलेट हवा असेल तर आता तुम्हाला त्याचाही पर्याय मिळणार आहे. आता गप्पा मारताना पहिल्या ओळीच्या पुढे बुलेट दिला तर आपोआप पुढच्या सर्व ओळींमध्ये येईल.
WhatsApp ची माहिती देणाऱ्या WABetainfo या वेबसाइटनुसार, सध्या या फीचरची बीटा व्हर्जनवर चाचणी सुरू आहे. हे अँड्रॉइड आणि iOS OS दोन्हीच्या बीटा व्हर्जनमध्ये टेस्टसाठी सादर करण्यात आले आहे. म्हणजेच हे फीचर अँड्रॉईड आणि आयफोन या दोन्ही उपकरणांमध्ये येईल.
WhatsApp चं हे फीचर सोप्या भाषेत समजून घ्यायचं असेल तर चॅटिंग दरम्यान, बोल्ड, इटॅलिक, स्ट्राइकथ्रू आणि अंडरलाईन फीचरव्यतिरिक्त, तुम्हाला टेक्स्ट अरेंज करणं म्हणजे ब्लॉक्स, बुलेट लिस्ट, नंबर लिस्ट, कोट ब्लॉक यांसारखे फीचर देखील मिळतील. एखादा विशिष्ट भाग हायलाइट करायचा असल्यास, तुम्हाला कोट ब्लॉक नावाचं फीचर मिळेल.