WhatsApp वापरणाऱ्यांनो आधी पुरावा द्या; एखाद्याला रिपोर्ट केल्यास पहिली अट
By हेमंत बावकर | Published: November 5, 2020 05:00 PM2020-11-05T17:00:30+5:302020-11-05T17:01:51+5:30
WhatsApp : भारतीयांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप सापडणार नाही असे होऊच शकणार नाही. एसएमएस, एमएमएसची हवाच या सोशल मेसेंजिग अॅपने काढून टाकली आहे.
नवी दिल्ली : इन्स्टंट मॅसेजिंग अॅप WhatsApp दरवेळेला काहीना काही नवीन फिचर युजरना देत असते. असेच एक फिचर याआधीच देण्यात आले होते. यामध्ये एखादा व्यक्ती त्रास देत असेल तर त्याला ब्लॉक करणे किंवा त्याचा रिपोर्ट करणे हा पर्याय देण्यात आला होता. त्रास म्हणजे नेमके काय करतो, याचे आता पुरावे व्हॉट्सअॅपला द्यावे लागणार आहेत.
नवीन फिचरमध्ये युजरला एखादे व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट रिपोर्ट करायचे असेल तर आधी पुरावा द्यावा लागणार आहे. हा पुरावा म्हणून युजरला त्याचे लेटेस्ट चॅट व्हॉट्सअॅपला शेअर करावे लागणार आहेत. एका रिपोर्टनुसार हे फिचर 2.20.206.3 अँड्रॉईड व्हर्जनवर मिळाले आहे. सध्या हे फिचर बीटा युजर वापरू शकतात.
सध्या व्हॉट्सअॅपवर युजर कोणत्याही स्पॅमिंग किंवा हॅरॅसमेंटची शिकार होत असतील तर त्यांना ते कॉन्टॅक्ट किंवा बिझनेस अकाऊंटचा रिपोर्ट करता येतो. नवीन फिचरनुसार हा रिपोर्ट करताना कारवाईसाठी त्याचे कारणही हवे असणार आहे.
महत्वाचे म्हणजे या फिचरमुळे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीचा नंबर रिपोर्ट केला तर तुम्हाला एक मेसेज दिसणार आहे. यामध्ये 'Most recent messages from this user will be forwarded to WhatsApp. असे लिहिलेले असणार आहे. यानुसार तुम्हाला आलेले त्या व्यक्तीचे मॅसेज व्हॉट्सअॅपला फॉरवर्ड केले जाणार आहेत. Wabetainfo नुसार व्हॉट्सअॅप ते चॅट पडताळल्यानंतर त्या अकाऊंटविरोधात कारवाई करणार आहे.
कोण कोणते चॅट तुमच्या मोबाईलची स्टोरेज स्पेस खातेय? WhatsApp मध्ये असे चेक करा
भारतीयांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअॅप सापडणार नाही असे होऊच शकणार नाही. एसएमएस, एमएमएसची हवाच या सोशल मेसेंजिग अॅपने काढून टाकली आहे. परंतू, जगभरात प्रसिद्ध असेलेले हे WhatsApp आता डोकेदुखी ठरू लागले आहे. कारण बॅकअपसह मीडियासाठी एवढी स्पेस खातेय की हळूहळू मोबाईलमधील स्टोरेज संपू लागले आहे. कंपनीचे ग्रुप, फॅमिलीचे ग्रुप, मित्र-मैत्रिणींचे ग्रुप यासह सोसायटी, पक्ष आदी ग्रुप असा मेसेजचा ढिगाराच आता प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये साचू लागला आहे. फेसबुकने म्हटल्यानुसार जगभरातून 100 अब्ज मेसेज दिवसाला पाठविले जात असतात. आता तुम्हाला सर्वाधिक मेसेज कोणाचे, कोणाचे मेसेज जास्त जागा खातात हे देखील पाहता येणार आहे.
हॅट्स ऑफ इंडियन आर्मी; लाँच केले व्हॉट्सअॅप सारखे मेसेंजिग अॅप SAI