अलर्ट! WhatsApp युजर्सना बसू शकतो झटका, दुर्लक्ष केल्यास मोजावी लागेल मोठी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 12:38 IST2025-04-12T12:37:41+5:302025-04-12T12:38:10+5:30

गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार WhatsApp द्वारे लोकांना टार्गेट करत आहेत. ते फेक मेसेज, फिशिंग लिंक्स आणि कॉल्सद्वारे गरीब लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.

WhatsApp users this news is for you if you ignore privacy settings you will have to pay big price know everything | अलर्ट! WhatsApp युजर्सना बसू शकतो झटका, दुर्लक्ष केल्यास मोजावी लागेल मोठी किंमत

अलर्ट! WhatsApp युजर्सना बसू शकतो झटका, दुर्लक्ष केल्यास मोजावी लागेल मोठी किंमत

आजकाल प्रत्येकजण WhatsApp वापरतं. WhatsApp वेळोवेळी आपल्या युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स देखील आणत असतं. या मेसेजिंग अॅपद्वारे दूर असलेल्या लोकांना मेसेज पाठवणं किंवा त्यांना ऑडिओ-व्हिडिओ कॉल करणं सोपं झालं आहे. पण जसे याचे फायदे आहेत तसे काही तोटे देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगार WhatsApp द्वारे लोकांना टार्गेट करत आहेत. ते फेक मेसेज, फिशिंग लिंक्स आणि कॉल्सद्वारे गरीब लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत, WhatsApp वर काही प्रायव्हसी सेटिंग्ज सेट करून तुम्ही ऑनलाइन फसवणूक कशी टाळू शकता हे जाणून घेऊया...

WhatsApp वर प्रोफाइल पिक्चर प्रायव्हसी

आपण सर्वजण WhatsApp वर प्रोफाइल फोटो ठेवतो, पण तुम्हाला माहिती आहे का की याच फोटोमुळे धोका वाढू शकतो. बरेच स्कॅमर तुमचा प्रोफाइल पिक्चर चुकीच्या पद्धतीने वापरू शकतात, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. अशा परिस्थितीत, तुम्हाला प्रोफाइल पिक्चर फक्त विश्वासार्ह आणि ओळखीच्या लोकांपुरता मर्यादित ठेवावा लागेल.

यासाठी तुम्हाला सेटिंग्जमध्ये काही बदल करावे लागतील. सर्वप्रथम, WhatsApp सेटिंग्ज > प्रायव्हसी > प्रोफाइल फोटो वर जा आणि नंतर 'माय कॉन्टॅक्ट' किंवा 'माय कॉन्टॅक्ट एक्सेप्ट' निवडा. आता तुमचा प्रोफाइल फोटो कोण पाहू शकतं हे तुम्ही ठरवू शकता. 

लास्ट सीन बंद करा

जर तुमचे लास्ट सीन ओपन असेल तर तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटीचा मागोवा घेणं कोणालाही सोपं जातं आणि स्कॅमर देखील तेच करतात. तुम्ही कधी ऑनलाइन आहात हे ते तुमचा लास्ट सीन पाहून शोधतात. अशा परिस्थितीत, जेव्हा त्यांना कळतं की तुम्ही विशिष्ट वेळी WhatsApp वर सक्रिय आहात, तेव्हा ते लगेच तुम्हाला टार्गेट करतील. म्हणून 'लास्ट सीन' ठेवू नका.

टू स्टेप्स व्हेरिफिकेशन ऑन करा

टू स्टेप्स व्हेरिफिकेशकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ही सेटिंग चालू केल्यानंतर, कोणीही तुमचं WhatsApp वापरू शकणार नाही. ही सेटिंग चालू केल्याने, जरी कोणी तुमचा OTP चोरला तरी तो तुमचे WhatsApp अकाऊंट वापरू शकणार नाही. तुमचं अकाऊंट लॉगिन करण्यासाठी स्कॅमरला OTP नंतर 6-अंकी पिन देखील टाकावा लागेल. 

- WhatsApp सेटिंग्जमध्ये जा.
-सेटिंग्ज > टू-स्टेप व्हेरिफिकेशन मधील प्रायव्हसी वर क्लिक करा.
-तुम्हाला ६-अंकी पिन सेट करण्याचा पर्याय मिळेल.
-आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी येथे द्यावा लागेल जेणेकरून जर तुम्ही पिन विसरलात तर तो पुन्हा रीसेट करू शकाल.

Web Title: WhatsApp users this news is for you if you ignore privacy settings you will have to pay big price know everything

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.