डिजिटल पेमेंटच्या मार्केटवर कब्जा करण्यासाठी Whatsapp ची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 03:53 PM2021-12-01T15:53:05+5:302021-12-01T15:53:37+5:30
Whatsapp : विशेष म्हणजे अलीकडेच NPCI (National Payments Corporation of India) ने व्हॉट्सअॅपला आपल्या युजर्स मर्यादा 2 कोटींवरून 4 कोटींपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे.
नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सतत आपल्या युजर्सच्या सुविधांसाठी नवीन मार्ग शोधत असतात. अशा परिस्थितीत व्हॉट्सअॅप इंडिया आपल्या डिजिटल पेमेंट विभागात पुढील 6 महिन्यांत मोठी गुंतवणूक करण्याची तयारी करत आहे.
विशेष म्हणजे अलीकडेच NPCI (National Payments Corporation of India) ने व्हॉट्सअॅपला आपल्या युजर्स मर्यादा 2 कोटींवरून 4 कोटींपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. या डबल युजर्स बेससोबत WhatsApp India आता Google Pay, PhonePay, Paytm, JioPay सोबत स्पर्धा करण्याची तयारी करत आहे.
दरम्यान, व्हॉट्सअॅपचा संपूर्ण भारतात 40 कोटी युजर बेस आहे. अशा परिस्थितीत, जर NPCI युजर बेस लिमिट काढून टाकल्यास, WhatsApp Pay सर्वात मोठा प्लेअर म्हणून उदयास येऊ शकते.
याचबरोबर, NPCI च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात भारतात 7.7 लाखांचे रेकॉर्डब्रेक डिजिटल पेमेंट झाले. तर सप्टेंबरमध्ये हा आकडा 6.54 लाख होता. दरम्यान, PhonePe सध्या डिजिटल पेमेंट मार्केटमध्ये आघाडीवर आहे.