जबरदस्त! Whatsapp देणार आणखी आनंद, स्टेट्सबाबत आणलं नवं अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 02:41 PM2024-05-27T14:41:07+5:302024-05-27T15:00:13+5:30
सोशल मीडियावर WhatsApp हे मेसेंजिंग अॅप प्रसिद्ध आहे. हे App नेहमी नवीन फिचर अपडेट करत असतं. व्हॉट्सॲपवर स्टेटस हे फिचर वापरकर्त्यांचे आवडते फिचर बनले आहे.
सोशल मीडियावर WhatsApp हे मेसेंजिंग अॅप प्रसिद्ध आहे. हे App नेहमी नवीन फिचर अपडेट करत असतं. व्हॉट्सॲपवर स्टेटस हे फिचर वापरकर्त्यांचे आवडते फिचर बनले आहे, यावर अनेकजण त्यांचे आवडते फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. आता व्हॉट्सॲप स्टेटस पोस्ट करणे पूर्वीपेक्षा अधिक मजेशीर होणार आहे. व्हॉइस नोट्सच्या बाबतीत व्हॉट्सॲपने बदल केले आहेत. जर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना बोलून काही अपडेट्स द्यायचे असतील तर त्यात एक लांबलचक व्हॉइस नोट जोडता येईल,यामुळे आता वापरकर्त्यांना स्टेट्सवर व्हॉईस नोटही ठेवता येणार आहे.
आतापर्यंत वापरकर्ते फक्त ३० सेकंदांच्या व्हॉइस नोट्स बनवू शकत होते, पण यामुळे अनेक वेळा महत्त्वाच्या गोष्टी राहत होत्या. आताव्हॉट्सॲपने ३० सेकंदांऐवजी १ मिनिटाच्या व्हॉईस नोट्स वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. iOS व्हर्जन 24.10.10.74 साठी WhatsApp Beta वर हे अपडेट आले आहे.
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
व्हॉट्सॲप बीटा यूजर्स नवीन अपडेटमध्ये हे फीचर पाहू शकतात. व्हॉट्सॲपच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एका ट्विटमध्ये या फिचरची माहिती दिली आहे.
नवीन फीचर कधी लाँच होणार याची नेमकी माहिती सध्या उपलब्ध नाही. पण कंपनीने हे फीचर काही ठिकाणी आणण्यास सुरुवात केली आहे. हे फिचर टप्प्याटप्प्याने आणले जाईल.