नवीन प्रकारचा बग... व्हॉट्सॲपमुळे होईल फोन हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 11:06 AM2021-09-07T11:06:51+5:302021-09-07T11:07:34+5:30

इमेज फिल्टर करताय? तर... सावध व्हा!

WhatsApp will hack the phone! | नवीन प्रकारचा बग... व्हॉट्सॲपमुळे होईल फोन हॅक!

नवीन प्रकारचा बग... व्हॉट्सॲपमुळे होईल फोन हॅक!

Next
ठळक मुद्देवापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहिती आणि खासगी तपशिलावर डल्ला मारणाऱ्या बगचा व्हॉट्सॲपने तातडीने बंदोबस्त केला आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क
व्हॉट्सॲप हे आता अनेकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत मोडते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत व्हॉट्सॲपचा सढळ हस्ते वापर केला जात असतो. सेल्फी काढण्याचा दर तर ताशी २५-५० सहज असतो. त्यातच मोबाइल कॅमेराद्वारे फोटो टिपण्याचे छंदही जडलेले आहेत अनेकांना. आपण काढलेला फोटो किवा सेल्फी अधिकाधिक उत्तम दिसावा यासाठी तो फिल्टर करण्याचे प्रमाणही वाढले आहे. इथेच फसवणूक होण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सॲपकडून करेक्ट कार्यक्रम
वापरकर्त्यांच्या वैयक्तिक माहिती आणि खासगी तपशिलावर डल्ला मारणाऱ्या बगचा व्हॉट्सॲपने तातडीने बंदोबस्त केला आहे. 
या बगला अटकाव करणारी यंत्रणा व्हॉट्सॲपने जारी केल्यामुळे वापरकर्त्यांना या बगची चिंता नाही. 
वस्तुत: या बगचा शोध सायबरतज्ज्ञांना गेल्या वर्षी डिसेंबरात लागला होता. त्यानंतर व्हॉट्सॲपने त्यात संशोधन करून तातडीने दुरुस्ती केली. 

व्हॉट्सॲप इमेज बग नावाचा नवा हॅकिंगचा प्रकार हॅकर्सनी शोधून काढला आहे. 

व्हॉट्सॲपवरील इमेज फिल्टर हे टूल वापरताच हा बग सक्रिय होतो आणि वापरकर्त्याच्या फोनमध्ये शिरतो.

या बगच्या माध्यमातून हॅकर्स व्हॉट्सॲप वापरकर्त्याची वैयक्तिक माहिती आणि खासगी तपशील यावर डल्ला मारू शकतात.

 

Web Title: WhatsApp will hack the phone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.