काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

By सायली शिर्के | Published: September 23, 2020 04:07 PM2020-09-23T16:07:13+5:302020-09-23T16:09:14+5:30

व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत.

whatsapp will soon rolls out expiring media feature for users | काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

काय सांगता? WhatsApp वर पाठलेले फोटो-व्हिडीओ होणार गायब 

Next

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅप देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. लवकरच युजर्सना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे. यामुळे मेसेज एका टाईम लिमिटच्या आतमध्ये ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्टसोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे. 

WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, Expiring Media (एक्सपायरिंग मीडिया) या नावाने फोटो आणि व्हिडीओ स्वतः गायब करणारे फीचर लाँच करण्यात येणार आहे. हे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर किंवा एक्सपायरिंग मेसेज फीचरचे एक एक्सटेंशन असणार आहे. युजर्संकडे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेजच्या रुपाने फोटो, व्हिडीओ किंवा GIF फाइल पाठवण्याचा ऑप्शन असणार आहे. रिसीव्हरने पाहिल्यानंतर ती मीडिया फाईल स्वतः गायब होईल.

विशेष म्हणजे डिलीट फॉर इव्हरीवन फीचरप्रमाणे This media is expired लिहिले जाणार नाही. तर हे पूर्ण प्रमाणे गायब होणार आहे. याशिवाय सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेज हा नॉर्मल मेसेजपेक्षा थोड्या वेगळ्या फॉर्मेटमध्ये येईल. तसेच रिसीव्हरला ही फाईल गायब होणार असल्याचे आधीच संकेत मिळतील. सध्या या व्हॉट्सअ‍ॅप फीचरची टेस्टिंग सुरू आहे. युजर्संपर्यंत पोहोचेपर्यंत यात कोणताही बदल पाहायला मिळू शकतो. तसेच कंपनी मल्टी डिव्हाईस सपोर्ट फीचरवर देखील काम करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार

व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे. व्हॉट्सअ‍ॅपमध्ये लवकरच युजर्सना एक अकाऊंट हे मल्टीपल डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येणार आहे. WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, सध्या हे फीचर फायनल स्टेजमध्ये आहे. तसेच व्हॉट्सअ‍ॅप आता ते बीटा अ‍ॅपसाठी जारी करणार आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, मल्टिपल डिव्हाईस फीचर आल्यानंतर युजर्स एकाचवेळी 4 डिव्हाईसमध्ये एकाच व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटचा वापर करू शकणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप 2009 मध्ये लाँच करण्यात आल्यानंतर युजर्स या फीचरची सातत्याने मागणी करीत आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅप केवळ एकाच डिव्हाईसमध्ये एकाच वेळी वापरता येतं. व्हॉट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनसाठी वापरता येतं ज्यावेळी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरू असेल.

मस्तच! आता Google सांगणार तुम्हाला कोण करतंय कॉल?, TrueCaller ला टक्कर

जबरदस्त! WhatsApp ची कमाल सेटिंग, कोणीच वाचू शकणार नाही तुमचं चॅटिंग

अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार, एकाच बटणाने व्हॉईस, व्हिडीओ कॉलिंग करता येणार

व्हॉट्सअ‍ॅपने अशीच आणखी काही भन्नाट फीचर्स आणली आहे. व्हॉट्सअ‍ॅपने कॅटलॉग शॉर्टकट, व्हॉट्सअ‍ॅप डूडल आणि न्यू कॉल बटण अशी तीन जबरदस्त फीचर्स आणली आहेत. WABetaInfo ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार,अँड्रॉईड बीटाच्या लेटेस्ट कोडवर हे फीचर्स दिसले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप संबंधित बातमी आणि अपडेटला ट्रॅक करणारी वेबसाईट WABetaInfo ने या नवीन फीचर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपला बीटा व्हर्जन 2.20.200.3 ची गरज असल्याचं सांगितलं आहे. रिपोर्ट्सनुसार, सध्या नवीन कॉल बटणाची टेस्टिंग केली जात आहे. नवीन कॉल बटणला कंपनी सुरूवातीला बिजनेस चॅट्ससाठी ऑफर करणार आहे. नवीन कॉल बटण हे व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलसाठी शॉर्टकट म्हणून देण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"मोदींनी काँग्रेसने निर्माण केलेले संबंध संपुष्टात आणले, आजूबाजूला एकही मित्र नसणे धोकादायक"

Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईची झाली तुंबई, तुफान पावसाने सर्वसामान्यांचे हाल; वाहतुकीचे तीनतेरा

माता न तू वैरिणी! 5 लाखांसाठी अल्पवयीन मुलीला विकलं, दुप्पट वयाच्या व्यक्तीसोबत लग्न लावलं अन्...

"चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोप

"संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना वर्षभरासाठी निलंबित करा", आठवलेंचं मोदींना पत्र

Web Title: whatsapp will soon rolls out expiring media feature for users

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.