महत्वाची बातमी! तुमच्या स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप लवकरच बंद होऊ शकते, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 03:50 PM2021-03-09T15:50:38+5:302021-03-09T15:52:17+5:30
WhatsApp : व्हॉट्सअॅपचे आगामी फिचर आर्काइव्ह चॅटचे व्हर्जन लवकरच येणार आहे.
नवी दिल्ली : फेसबुकचे (Facebook) मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप (WhatsApp) काही फोनसाठी सपोर्ट बंद करणार आहे. व्हॉट्सअॅप ट्रॅकर WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप बीटाचे 2.21.50 व्हर्जन iOS 9 आणि त्यापूर्वीचे सपोर्ट करणाऱ्या डिव्हाईसला आता सपोर्ट करणार नाही. (whatsapp will stop support on ios 9 or older device know details and upcoming features)
व्हॉट्सअॅपने सध्या आपल्या FAQ पेजला अपडेट केले नाही. मात्र एकदा हे व्हर्जन सार्वजनिक झाल्यानंतर ते अपडेट केले जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ असा की, iPhone 4 आणि iPhone 4s फोनवर व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही.
सध्या iPhone 5 हा शेवटचा आयफोन आहे, ज्यावर व्हॉट्सअॅप कार्यरत आहे, आयफोन 5 ला 10.3 पर्यंत अपडेट मिळाले आहे. अँड्रॉईड युजर्संसाठी व्हॉट्सअॅप व्हर्जन 4.0.3 आणि त्यानंतरच्या अँड्रॉईडवर चालणार्या स्मार्टफोनला सपोर्ट करते.
अखेरीस iOS आणि अँड्रॉईड व्यतिरिक्त व्हॉट्सअॅप KaiOS वर सुद्धा काम करत आहे, जे जिओ फोन आणि जिओ फोन 2 सारख्या फिचर फोनवर काम करते. याशिवाय, व्हॉट्सअॅपचे आगामी फिचर आर्काइव्ह चॅटचे उत्तम व्हर्जन लवकरच येणार आहे. WABetaInfo च्या म्हणण्यानुसार, हे फिचर सध्या डेव्हलपमेंट टप्प्यावर आहे.
तसेच, व्हॉट्सअॅप काही यूआय (यूजर इंटरफेस) वरही काम करत आहे, ज्यामुळे युजर्संना आर्काइव्ह चॅटमध्ये पाहता येणार आहे, असे म्हटले आहे. आर्काइव्ह चॅट्सची येणारी सर्व नोटिफिकेशन म्यूट असणार आहेत. म्हणजेच, युजर्सला आर्काइव्ह चॅट्समध्ये येणारे मेसेज समजणार नाहीत. हे फिचर पर्यायी असणार आहे, असे WABetaInfo चे म्हणणे आहे.