मोठी बातमी! 1 जानेवारी 2021 पासून 'या' स्मार्टफोन्सवर बंद होईल WhatsApp, पाहा लिस्ट...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 05:21 PM2020-12-16T17:21:37+5:302020-12-16T17:28:46+5:30

WhatsApp : 2021च्या सुरूवातीस, म्हणजे 1 जानेवारीपासून काही जुन्या अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. 

whatsapp will stop supporting in older operating version of android and iphone see phone list | मोठी बातमी! 1 जानेवारी 2021 पासून 'या' स्मार्टफोन्सवर बंद होईल WhatsApp, पाहा लिस्ट...

मोठी बातमी! 1 जानेवारी 2021 पासून 'या' स्मार्टफोन्सवर बंद होईल WhatsApp, पाहा लिस्ट...

googlenewsNext
ठळक मुद्देरिपोर्टनुसार, iOS 9 आणि अँड्रॉईड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमच्या खालील स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु होणार नाही.

नवी दिल्ली : नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपकडून जुन्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपला सपोर्ट बंद केला जातो. त्यानंतर पुन्हा नवीन ऑपरेटिंग सिस्टमसाठी व्हॉट्सअ‍ॅपकडून लिस्ट जाहीर केली जाते. 2021च्या सुरूवातीस, म्हणजे 1 जानेवारीपासून काही जुन्या अँड्रॉइड फोन आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. 

रिपोर्टनुसार, iOS 9 आणि अँड्रॉईड 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टमच्या खालील स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप सुरु होणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपचे सपोर्ट पेज युजर्सला ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट व्हर्जनचा वापर करण्याचा सल्ला देते जेणेकरुन ते सर्व फीचर्स वापरू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपची सर्व फीचर्स वापरण्यासाठी आयफोन युजर्सला iOS 9 किंवा त्यापेक्षा लेटेस्ट व्हर्जन आणि अँड्रॉइड युजर्ससाठी 4.0.3 किंवा त्यावरील व्हर्जन वापरणे आवश्यक आहे, असे सांगण्यात येते. 

'या' iPhone मॉडेलवर बंद होईल व्हॉट्सअ‍ॅप
अ‍ॅपलचे iPhone 4, iPhone 4S, iPhone 5, iPhone 5S, iPhone 6 आणि  iPhone 6S ला ऑपरेटिंग सिस्टम iOS 9 ने अपडेट करावे लागेल. दरम्यान, iPhone 6S, 6 Plus आणि iPhone SE हे पहिले जेनरेशनचे आयफोन आहेत, जे iOS 14 वरून अपडेट केले जाऊ शकतात.

'या' Android फोनवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही
जे फोन अँड्रॉइड  4.0.3 वर काम करत नाही, अशा डिव्हाइसवर व्हॉट्सअ‍ॅप चालणार नाही. यामध्ये HTC Desire, LG Optimus Black, Motorola Droid Razr, Samsung Galaxy S2 यासारखे मॉडल्स आहेत. दरम्यान, तुमचा फोन कोणत्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालू आहे, हे तुम्हाला माहिती नसल्यास, ते जाणून घेण्याचा मार्ग खूप सोपा आहे. यासाठी, तुम्हाला तुमच्या आयफोन किंवा अँड्रॉइडच्या सेटिंग्जवर जावे लागेल.
- जर तुम्ही आयफोन युजर आहात, तर यासाठी तुम्ही आधी Settings मध्ये जा. 
- त्यानंतर General  वर टॅप करा.
- Information वर गेल्यानंतर तुम्हाला आयफोनच्या सॉफ्टवेअरची माहिती मिळेल.

लगेच अपडेट करा फोन
अँड्राईड युजर्सला सर्वात आधी Settingsवर जावे लागेल. त्यानंतर  येथे About Phone मध्ये जाऊन युजर फोनच्या ऑपरेटिंग सिस्टमविषयी माहिती मिळू शकेल. ज्यांच्याजवळ फोन अपडेट करण्याचा ऑप्शन आहे, त्यांनी त्वरित नवीन सॉफ्टवेअरसह अपडेट करावे, तर ज्या युजर्संना फोन अपडेट करण्याचा ऑप्शन नाही, त्यांना व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी नवीन फोन खरेदी करावा लागेल.

Web Title: whatsapp will stop supporting in older operating version of android and iphone see phone list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.