WhatsApp: खुशखबर! दोन दिवसानंतर देखील Delete करता येणार पाठवलेले मेसेज; कंपनीनं ऐकली युजर्सची मागणी
By सिद्धेश जाधव | Published: February 3, 2022 03:34 PM2022-02-03T15:34:56+5:302022-02-03T15:37:39+5:30
Whatsapp Delete For Everyone: Whatsapp ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचरमधील वेळ मर्यादा वाढवणार आहे. सध्या एक तास, आठ मिनिटं आणि 16 सेकंदांची ही मर्यादा दोन दिवस आणि 12 तास केली जाईल.
WhatsApp आपल्या युजर्ससाठी एका बहुप्रतीक्षित फिचरवर काम करत आहे. लवकरच एका नवीन अपडेटच्या माध्यमातून हे फिचर युजर्सच्या भेटीला येईल. या अपडेटनंतर तुम्ही कोणताही मेसेज दोन दिवसानंतर देखील डिलीट करू शकाल. यासाठी कंपनी ‘डिलीट फॉर एव्हरीवन’ फीचरमधील वेळ मर्यादा वाढवणार आहे. सध्या एक तास, आठ मिनिटं आणि 16 सेकंदांची ही मर्यादा दोन दिवस आणि 12 तास केली जाईल. यामुळे चुकून गेलेला किंवा गेलेला चुकीचा मेसेज तुम्ही दोन दिवसानंतर देखील डिलीट करू शकाल.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, WhatsApp च्या बीटा व्हर्जन 2.22.410 मध्ये सध्या हे फिचर दिसत आहे. परंतु लवकरच सर्वसांसाठी हे फिचर उपलब्ध होऊ शकतं. याआधी देखील डिलीट फॉर एव्हरीवन फिचरच्या कालावधीत कंपनीनं असा बदल केला होता. त्यामुळेच सध्या उपलब्ध असलेली एक तासांची मर्यादा आली आहे. परंतु तरीही यात अजून वेळ देण्यात यावा अशी मागणी WhatsApp युजर्स करत होते.
हे फिचर उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही पाठवलेले टेक्स्ट, मीडिया फाईल किंवा डॉक्युमेंट्स देखील दोन दिवस आणि 12 तासांच्या आत कायमस्वरूपी डिलीट करता येतील. एकदा का तुम्ही या फिचरचा वापर करून मेसेज डिलीट केला कि तो रिसिव्हरच्या फोनमधून देखील गायब होईल. काही दिवसांपूर्वी हा कालावधी 7 दिवसांचा करण्यात येणार आहे, अशी बातमी देखील आली होती.
हे देखील वाचा:
- Flipkart Sale: iPhone 12 वर अशी मिळवा 25 हजार रुपयांची मोठी सूट; फक्त 3 दिवस आहे ऑफर
- हे आहेत 20 हजारांच्या आत येणारे बेस्ट स्मार्ट टीव्ही; Flipkart Sale मध्ये मिळतायत जबरदस्त ऑफर्स