WhatsApp खूपच स्लो काम करतंय? तर मग आजच करा क्लीन; जाणून घ्या, काही सोप्या स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:25 PM2021-09-15T15:25:00+5:302021-09-15T15:33:33+5:30

whatsapp News : व्हॉट्सअ‍ॅप हळू काम करत असेल किंवा हँग होत असेल तर ते क्लीन करण्याची गरज आहे. अ

whatsapp is working slowly so this is the step by step process to clean it | WhatsApp खूपच स्लो काम करतंय? तर मग आजच करा क्लीन; जाणून घ्या, काही सोप्या स्टेप्स

WhatsApp खूपच स्लो काम करतंय? तर मग आजच करा क्लीन; जाणून घ्या, काही सोप्या स्टेप्स

googlenewsNext

नवी दिल्ली - स्मार्टफोनचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये युजर्सच्या आवडीचे, उपयोगाचे विविध अ‍ॅप्स हे हमखास असतात. मात्र कोणतंही अ‍ॅप्लिकेशन एका ठराविक कालावधीनंतर थोडं स्लो काम करण्यास सुरुवात करतं. व्हॉट्सअ‍ॅपवर देखील असंच होते. व्हॉट्सअ‍ॅप हळू काम करत असेल किंवा हँग होत असेल तर ते क्लीन करण्याची गरज आहे. अनेकदा युजर्सच्या चॅटमध्ये फोटो, व्हिडीओ आणि डॉक्यूमेंट्स, फाईल्स स्टोर असतात. या फाईल्स डिलीट न केल्याने ही समस्या उद्धभवते. व्हॉट्सअ‍ॅप कसं क्लिन करू शकता याबाबत जाणून घेऊया...

WhatsApp मध्ये 'हे' फीचर करा डिसेबल

जर तुमच्या फोनची स्पेस फुल झाली असल्यास याचा परिणाम व्हॉट्सअ‍ॅपवर देखील होईल. यापासून वाचण्यासाठी तुम्ही अ‍ॅपमधील एक फीचर बंद ठेवू शकता. ज्यामुळे स्पेसचा जास्त वापर होणार नाही. तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपमध्ये मीडिया फाइल्सला ऑटो सेव्हचा पर्याय बंद करू शकता. यामुळे फक्त तुम्हाला हव्या असलेल्या मीडिया फाईल्सच फोनमध्ये सेव्ह होतील.

असं क्लिन करा व्हॉट्सअ‍ॅप

- सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून सेटिंग्समध्ये जा.

- त्यानंतर डेटा आणि स्टोरेजवर टॅप करा.

- आता खाली Storage Uses चा पर्याय दिसेल.

-  Storage Uses वर टॅप केल्यावर सर्व चॅट लिस्ट दिसेल.

- येथे तुम्ही कोणत्या चॅटसाठी किती स्टोरेज यूज होत आहे ते पाहू शकता.

तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणारे 'हे' सीक्रेट फीचर्स माहितीहेत का?

- यानंतर ज्या चॅटमधील फाईल्स डिलीट करायच्या आहेत त्यावर टॅप करा.

- आता फोटोसह सर्व लिस्ट तुमच्यासमोर असेल.

- आता यातील तुमच्या कामाच्या नसलेल्या फाईल्स डिलीट करू शकता.

- यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅप क्लिन होईल व स्पेस देखील वाढेल.

टेक, गॅजेटच्या लेटेस्ट बातम्यांसाठी इथे क्लिक करा....

https://www.lokmat.com/tech/


 

Web Title: whatsapp is working slowly so this is the step by step process to clean it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.