... तर WhatsApp भारतातून गाशा गुंडाळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 10:49 IST2019-02-07T10:41:23+5:302019-02-07T10:49:20+5:30
भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे.

... तर WhatsApp भारतातून गाशा गुंडाळणार
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे लोकप्रिय मेसेंजिंग अॅप असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. मात्र भारतात कार्यरत असलेल्या सोशल मीडिया कंपन्यांसाठी सरकारकडून प्रस्तावित नियम लागू झाल्यास व्हॉट्सअॅपचे भारतातील अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता आहे. बुधवारी (6 फेब्रुवारी) कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
भारतात व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची संख्या अधिक असून व्हॉट्सअॅपचे 20 कोटी युजर्स आहेत. कंपनीसाठी भारत ही जगातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. कंपनीचे जगभरात एकूण 1.5 अब्ज युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप कम्युनिकेशनचे प्रमुख कार्ल वूग यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या प्रस्तावित नियमांमध्ये मेसेजसचा शोध घेणे ही सर्वात मोठी समस्या आहे. तसेच स्त्रोताचा उगम शोधण्यावर भर देण्याबाबत प्रस्तावित नियमांमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
आता तुमचे #WhatsApp दुसरे कोणीही पाहू शकणार नाही, नवीन फीचर लाँच https://t.co/LVfmpdnqVe#technology
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 7, 2019
फेसबुकची मालकी असलेले व्हॉट्सअॅप मूलभूतरित्या एंड-टू-एंड एनक्रिप्शन करते. याचा अर्थ पाठवणारा आणि प्राप्त करणारा हे दोघेच मेसेज वाचू शकतात. व्हॉट्सअॅपलाही ते मेसेज वाचता येत नाहीत. तसेच जगभरातील लोकांना जी गोपनीयता हवी आहे, ती प्रस्तावित बदलाला अनुरूप नाही. आम्ही एंड-टू-एंड एनक्रिप्शन पुरवतो. पण नव्या नियमानुसार व्हॉट्सअॅपमध्ये बदल करावे लागणार अशा स्थितीत मेसेज सेवा आपल्या सध्याच्या रूपात देता येणार नाही, असे वूग यांनी सांगितले.
WhatsAppच्या 'या' ट्रिक्स तुम्हाला माहीत आहेत का?
नवे नियम लागू झाल्यानंतर भारतीय बाजारातून बाहेर पडण्याची शक्यता वूग यांनी फेटाळली नाही. एंड-टू-एंड एनक्रिप्शन फिचरमुळे तपास यंत्रणांना अफवा पसरवणाऱ्यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. सोशल मीडिया प्लॅटफार्मसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे प्रस्तावित नियमाअंतर्गत त्याच्या सेवांचा दुरूपयोग आणि हिंसा पसरवणाऱ्यांपासून रोखण्यासाठी योग्य प्रक्रियेचे पालन करावे लागेल.