मस्तच! WhatsApp वर लपवू शकता तुम्ही तुमचं नाव; 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल गायब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 04:23 PM2021-12-25T16:23:11+5:302021-12-25T16:25:04+5:30

WhatsApp News : युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करण्यासाठी खूप सारे फीचर्स उपलब्ध आहेत.

whatsapp you can hide your profile name following these easy steps | मस्तच! WhatsApp वर लपवू शकता तुम्ही तुमचं नाव; 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल गायब

मस्तच! WhatsApp वर लपवू शकता तुम्ही तुमचं नाव; 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल गायब

googlenewsNext

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करण्यासाठी खूप सारे फीचर्स उपलब्ध आहेत. असे काही फीचर्स देखील आहेत जे अद्यापही बऱ्याच जणांना माहीत नाहीत. त्यापैकी एक म्हणजे युजरचं नाव Invisible ठेवणं. युजर्सच्या सोयीसाठी एप्लिकेशनमध्ये अनेक ट्रिक्स आहेत, परंतु त्यापैकी बर्‍याच ट्रिक्स अद्याप वापरल्या जात नाहीत. अशीच एक सोपी ट्रिक जाणून घेऊया जिच्‍या मदतीने तुम्‍ही तुमचे नाव व्हॉट्सअ‍ॅपमध्‍ये Invisible Text सह बदल करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सना प्रोफाईल नेम ठेवण्याची संधी येतं. अनेकदा काही लोक आपली ओळख लपवण्यासाठी तिथे चुकीचं नाव अथवा एखादं चिन्ह टाकतात. पण असं करण्याची गरज नाही कारण तुम्ही invisible Text पाठवण्यासोबतच तुमची ओळख सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही तुमचे नाव इनविजिबल टेक्स्टसह बदलू शकता. WhatsApp वर तुमचे नाव इनविजिबल ठेवण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

- सर्वप्रथम तुमच्या मोबाईल आणि PC वर Whatsapp उघडा. 

- त्यानंतर ही दोन चिन्हे कॉपी करा. Symbols: ⇨ . 

- WhatsApp मधील Settings या पर्यायावर जा. तुमच्या सध्याच्या WhatsApp नावावर आणि नंतर पेन्सिल चिन्हावर टॅप करा. 

- आता बाण चिन्ह (⇨) काढून टाका आणि तुमचे नाव बदलण्यासाठी ओके वर टॅप करा. 

- WhatsApp वर तुमचे नाव इनविजिबल होईल.

एखाद्या व्यक्तीने तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये Add केल्यास तुम्ही जोपर्यंत त्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट म्हणून जोडत नाही तोपर्यंत ती व्यक्ती तुमचे नाव पाहू शकणार नाहीत. काही वेळात तुम्हाला अपडेट केलेले नाव दिसेल. WhatsApp अपडेट व्हायला थोडा वेळ लागतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

WhatsApp वर स्वतःचा नंबर न वापरता करू शकता मेसेज; जाणून घ्या, नेमकं कसं?

युजर्स स्वतःचा नंबर न वापरता व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट तयार करू शकतात. अशा युजर्ससाठी आता एक सोपी पद्धत उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला व्हर्च्यूअल नंबरची मदत घ्यावी लागेल. तुम्ही व्हर्च्यूअल नंबरने WhatsApp वर रजिस्टर्ड करू शकता. व्हर्च्यूअल नंबर तुमच्या फिजिकल सिम कार्डपेक्षा वेगळा असतो. मात्र, तुम्ही नियमित नंबरप्रमाणे याचा फोन व मेसेज रिसिव्ह करण्यासाठी वापर करू शकता. व्हर्च्यूअल नंबरसाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅपची मदत घ्यावी लागेल. यासाठी Doosra, TextNow सारखे अ‍ॅप आणि Sontel सारख्या वेबसाइट्सची मदत घेऊ शकता. अनेक वेबसाईट्स आणि अ‍ॅप देखील मोफत व्हर्च्यूअल नंबर मोफत देतात. मोफत नंबरचा वापर इतर युजर्स देखील वापर करू शकतात व यामुळे तुम्ही नंबरचा एक्सेस गमावू शकता.
 

Web Title: whatsapp you can hide your profile name following these easy steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.