व्हॉट्सॲपचे 'डेंजर' अपडेट, राहा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:58 PM2022-07-13T13:58:15+5:302022-07-13T13:58:15+5:30

व्हॉट्सॲप वापरत असाल आणि ते अपडेट करण्यासाठी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा....

WhatsApps Danger Update Beware might your data leake or stolen do not update third party | व्हॉट्सॲपचे 'डेंजर' अपडेट, राहा सावध!

व्हॉट्सॲपचे 'डेंजर' अपडेट, राहा सावध!

Next

व्हॉट्सॲप वापरत असाल आणि ते अपडेट करण्यासाठी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा, कारण ते बनावट असू शकते आणि त्याद्वारे दुसऱ्याच कंपनीचे बनावट ॲप डाऊनलोड होऊ शकते. यातून फसवणूकही होऊ शकते. काय आहे हे प्रकरण... जाणून घ्या...

कोणी दिला इशारा? व्हॉट्सॲपचे सीईओ विल कॅथकार्ट यांनी टि्वटरवर यासंदर्भात इशारा दिला आहे. कोणतेही नवीन व्हर्जन सध्या व्हॉट्सॲप युझर्सनी वापरू नये. अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.

कसे आढळले डेंजर ॲप? - हुबेहूब व्हॉट्सॲपसारख्या सेवा देणारे ॲप कंपनीच्या सुरक्षा संधोधन टीमला आढळले आहेत.

कुठून येते हे फेक ॲप? - व्हॉट्सॲपचे हे फेक ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. पण, काही मेसेज पाठवून, मेल पाठवून अपडेट्सची लिंक तुम्हाला दिली जाते. त्याद्वारे सहज फसवणूक होते.

काळजी काय घ्यावी? - आपले व्हॉट्सॲप ॲप अपडेट करायचे असेल तर केवळ व्हॉट्सॲपची अधिकृत वेबसाइट किंवा प्ले स्टोअरवरूनच ते करावे. इतर कोणत्याही वेबसाइटचा यासाठी आधार घेऊ नये. २ अब्ज एवढे व्हॉट्सॲपचे जगभरात सक्रिय वापरकर्ते आहेत. १०० अब्ज मेसेजेस रोज पाठवले जातात. ३८ मिनिटे (सरासरी) प्रत्येक युजर व्हॉट्सॲप वापरतो. ३९ कोटी व्हॉट्सॲप युजर्स भारतात आहेत. 

धोका देणारे ॲप कोणते? - हेमॉड्स या डेव्हलपर कंपनीने 'हे व्हॉट्सॲप' नावाचे ॲप तयार केले आहे. ते धोकादायक असून, त्याचा फटका लोकांना बसू शकतो, असे मूळ व्हॉट्सॲप कंपनीचे म्हणणे आहे. हे नवे बनावट ॲप युझर्सना नवनवे फिचर्स देण्याचे अमिष दाखवते. त्याद्वारे युझर्सची पर्सनल माहिती चोरली जाते. डेटाही घेतला जातो.

Web Title: WhatsApps Danger Update Beware might your data leake or stolen do not update third party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.