व्हॉट्सअॅपच्या 'या' खास फिचरमध्ये होणार मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 01:31 PM2018-10-15T13:31:59+5:302018-10-15T13:52:55+5:30
व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय मेसेंजिंग अॅप आहे.
नवी दिल्ली - व्हॉट्सअॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय मेसेंजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप हे सातत्याने त्यांच्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असतं. मात्र आता व्हॉट्सअॅपने एका खास फिचरमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर लाँच केले होते. या फिचरच्या माध्यमातून एखाद्या चॅटमध्ये किंवा ग्रुपवर चुकीने पाठविलेला मेसेज डिलीट करण्याची सुविधा युजर्संना देण्यात आली आहे. सुरुवातीला मेसेज डिलीट करण्याचा वेळ हा 7 मिनिटे होता. त्यानंतर तो वाढवून 1 तास 18 मिनिट 16 सेकंद करण्यात आला होता.
व्हॉट्सअॅप आता ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे खास फिचर अपडेट करणार आहे. अपडेटमुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठवलेला एखादा मेसेज डिलीट केलात आणि मेसेज पाठविलेल्या व्यक्तीचा फोन बंद असेल तर त्याला फोन सुरु केल्यावर तो मेसेज मिळणार आहे. 13 तास 8 मिनिटे आणि 16 सेकंदाच्या आत समोरच्याला तुम्ही मेसेज डिलीट केल्याचा संदेश न मिळाल्यास त्याला मेसेज डिलीट केला असला तरीही वाचता येणार आहे. या फिचरचा होणारा गैरवापर लक्षात घेऊन कंपनीने ही नवीन सुविधा लाँच केली आहे. व्हॉट्सअॅपचं हे फिचर पुढच्या आठवड्यापासून कार्यरत होईल असं म्हटलं जात आहे.