गुडन्यूज! व्हॉट्सअपचं नवं फिचर; ब्लुटूथप्रमाणे मोठ्या फाईल्सही शेअर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2024 02:10 PM2024-01-21T14:10:33+5:302024-01-21T14:12:02+5:30
डिजिटल इंडियामध्ये आणि मोबाईलच्या जमान्यात आता व्हॉट्सअप वापरणं ही काळाजी गरज बनली आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून संवाद आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट ...
डिजिटल इंडियामध्ये आणि मोबाईलच्या जमान्यात आता व्हॉट्सअप वापरणं ही काळाजी गरज बनली आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून संवाद आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट शेअर करणं सहज-सुलभ बनलं आहे. अगदी घरात बसून आपण जगभरातील आप्तेष्टांशी, सहकाऱ्यांशी किंवा व्यवसायिकांशी जोडले गेलो आहोत. त्यातून, अनेक गोष्टी शेअर केल्या जातात. व्हॉट्सअपकडूनही युजर्संसाठी नव्याने फिचर्स दिले जात आहेत. त्यामुळे, युजर्संना तांत्रिकदृष्टा अधिक सुविधा मिळते. व्हॉट्सअपकडून आणखी एक नवं फिचर्स युजर्संना दिलं जाणार आहे.
व्हॉट्सअपच्या नवीन फिचरद्वारे युजर्संना सहजरित्या ब्लुटूथप्रमाणे फाईल्सचे देवाण-घेवाण करता येईल. त्यामुळे, मोठ्या फाईल्सही पहिल्यापेक्षा अधिक वेगाने व सहजपणे आदान-प्रदान करता येतील. WhatsApp च्या अपकमिंग फिचर्सची माहिती देणाऱ्या वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. व्हॉट्सअपच्या या अपकमिंग फिचर्सद्वारे युजर्संना मोठ्या फाईल्स शेअर करता येतील. त्यासाठी, अॅपमध्ये नवीन पर्याय दिला जाणार आहे, (People Nearby) असं या फिचरचं नाव आहे.
📝 WhatsApp beta for Android 2.24.2.20: what's new?
— WABetaInfo (@WABetaInfo) January 19, 2024
WhatsApp is working on a new file sharing feature with people nearby, and it will be available in a future update!https://t.co/F8gAHlowUfpic.twitter.com/mXtH6jNqKy
Wabetainfo ने ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. सध्या हे फिचर टेस्टींग मोडवर आहे. मात्र, लवकरच तुमच्या व्हॉट्सअपमध्येही ही सुविधा सुरू होईल. त्यामुळे, केवळ मोठया फाईल्ससाठी एखादं अॅप्लिकेशन वापरावं लागण्याचे टळणार आहे. व्हॉट्सअप वापरणाऱ्या युजर्संना हे फिचर वापरता येणार आहे. त्यामुळे, फाईल्सची देवाण-घेवाण करण्यासाठी दोन्ही युजर्संकडे व्हॉट्सअप असणे बंधनकारक आहे.