WhatsApp ची सुरक्षा दुप्पट होणार, आता ईमेलद्वारेही तुमचं अकाऊंट चालवता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 01:52 PM2023-11-08T13:52:18+5:302023-11-08T13:52:45+5:30
आता WhataApp ची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे.
WhatsApp जगभरातील अनेकजण वापरतात. व्हॉट्सअपही वापरकर्त्यांना नेहमी नवीन फिचर लाँच करत असते, आता सुरक्षेबाबत कंपनीने एक महत्वाचं अपडेट दिलं आहे. या फिचरमुळे वापरकर्त्यांना डबल सुरक्षा मिळणार आहे. यात तुम्हाला अॅप लॉगिनसाठी ईमेल व्हेरिफिकेशनचा ऑप्शनही मिळणार आहे. आतापर्यंत आपल्याला फक्त फोन नंबरनेच लॉगिन करावं लागतं होतं. पण, आता याची पद्धत बदलणार असून वापरर्त्यांसाठी आणखी एक ऑप्शन मिळणार आहे.
१९ वर्षाच्या भारतीय मुलाने AI ब्राउझर तयार केला; सॅम ऑल्टमनने इतक्या कोटींची गुंतवणूक केली
WABetaInfo च्याअहवालानुसार, नवीन फीचर बीटा अपडेटवर जारी करण्यात आले आहे. WhatsApp च्या Android 2.23.24.10 अपडेट व्हर्जनवर पडताळणीसाठी 'ईमेल पत्ता' हा दुसरा पर्याय म्हणून जोडला आहे. सध्या हे फीचर व्हॉट्सअॅपच्या बीटा टेस्टर्ससाठी उपलब्ध आहे.
2.23.24.9 आणि 2.23.24.8 व्हर्जनवर काम करणाऱ्या काही लोकांना नवीन मार्गाने लॉग इन करण्याची संधीही मिळत आहे. ईमेल पडताळणी फिचरबद्दल काही गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अगोदर, ईमेल हा व्हॉट्सअॅप चालवण्याचा दुसरा पर्याय आहे. याचा अर्थ असा नाही की तो फोन नंबर बदलेल. व्हॉट्सअॅप खात्यांसाठी फोन नंबर हा डीफॉल्ट पडताळणी पर्याय असेल.
ईमेल पडताळणी हे एक पर्यायी फिचर असल्याने, ते वापरायचे की नाही हे वापरकर्त्यांवर आहे. तुम्ही उत्तम गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी हे फिचर वापरू शकता. फोन नंबर ही एक अतिशय खासगी गोष्ट आहे आणि तो व्हॉट्सअॅपवर वापरताना अनेकांना त्रासाचे होते. असे काहीजण आता ईमेल पडताळणीचा वापर करून वापरकर्ता अनुभव सुधारू शकतात.
तुम्ही WhatsApp चे बीटा व्हर्जन चालवत असाल, तर तुम्ही ईमेल पडताळणी फिचर शोधू शकता. यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये जावे लागेल. यानंतर अकाउंट ऑप्शनवर जा आणि ईमेल अॅड्रेस तपासा. जर ईमेल अॅड्रेस पर्याय दिसत असेल तर तुम्ही तुमचा ईमेल टाकून पडताळणी प्रक्रिया पूर्ण करू शकता.