Whatsapp चे भन्नाट फिचर; Face किंवा Touch ID ने करा लॉक-अनलॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 03:42 PM2019-02-04T15:42:40+5:302019-02-04T15:44:01+5:30

फेसबुकच्या मालकीचे Whatsapp हे अ‍ॅप गेल्या काही वर्षांत कमालीचे बदलत गेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरीच्या बीबीएमवर मासिक रेंटल द्यावे लागत होते. मात्र, Whatsapp ने मोफत मॅसेज पाठविण्याची सुविधा देत ब्लॅकबेरीची मक्तेदारी कायमची मोडीत काढली.

Whatsapp's unique feature; use Face or Touch ID Lock-unlock | Whatsapp चे भन्नाट फिचर; Face किंवा Touch ID ने करा लॉक-अनलॉक

Whatsapp चे भन्नाट फिचर; Face किंवा Touch ID ने करा लॉक-अनलॉक

googlenewsNext

मुंबई : फेसबुकच्या मालकीचे Whatsapp हे अ‍ॅप गेल्या काही वर्षांत कमालीचे बदलत गेले आहे. काही वर्षांपूर्वी ब्लॅकबेरीच्या बीबीएमवर मासिक रेंटल द्यावे लागत होते. मात्र, Whatsapp ने मोफत मॅसेज पाठविण्याची सुविधा देत ब्लॅकबेरीची मक्तेदारी कायमची मोडीत काढली. काळानुसार बदलत जाणे आणि त्यामध्ये चांगले चांगले बदल केल्यास स्पर्धेत टिकता येते, ही बाब फेसबुकने हेरली. आता बऱ्याच मोबाईलमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट स्कॅनरचे फिचर येत आहे. यामुळे या फिचरद्वारे व्हॉट्सअपची सुरक्षाही अद्ययावत करण्यात आली आहे. सुरुवातीला हे फिचर केवळ आयफोनपुरतेच मर्यादित असले तरीही येत्या काळात ते अँड्रॉईडवरही देण्यात येणार आहे. 


व्हॉट्सअ‍ॅपने आयओएस प्लॅटफॉर्मवर बायोमेट्रीक ऑथेंटिकेशन वापरले आहे. युजरला त्याच्या Face ID किंवा Touch ID वरून अ‍ॅप लॉक किंवा अनलॉक करण्याची सोय देण्यात आली आहे. महत्वाची बाब म्हणजे, पत्येक चॅटसाठी हे फिचर नसून काही गोपनिय किंवा खास चॅट असल्यास लॉक करता येणार आहे. सध्या हे फिचर WhatsApp च्या 2.19.20 या बिटा व्हर्जनवर उपलब्ध केले आहे. 

कसे कराल...?
iOS युजरना WhatsApp चे 2.19.20 हे व्हर्जन अपडेट करावे लागेल, यानंतर सेटिंगमध्ये जात अकाऊंटमध्ये जावे लागेल. यामध्ये प्रायव्हसीवर टॅप करून Screen Lock सुरु करावे लागेल. लक्षात असू द्या, की iPhone X किंवा त्यावरच्या फोनमध्ये FaceID ची सुविधा मिळते. Screen Lock च्या खाली TouchID किंवा पासकोड हा पर्याय असेल. ते ही सुरु करावे लागेल. ऑथेंटिकेशन असले तरीही युजर फोनच्या लॉक स्क्रीनवर मॅसेजला रिप्लाय देऊ शकणार आहेत. तसेच ऑथेंटिकेशनशिवाय व्हॉट्सअ‍ॅप कॉलही उचलू शकणार आहेत.

Web Title: Whatsapp's unique feature; use Face or Touch ID Lock-unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.