सीईओ सुंदर पिचाई यांचाच जन्मदिवस चुकीचा सांगतय Google, समोर आल्या दोन तारखा!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 03:47 PM2021-06-10T15:47:30+5:302021-06-10T15:59:50+5:30
आज पिचाई यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे, मात्र, त्यांच्या जन्म तारखेवरून चर्चा सुरू आहे.
नवी दिल्ली - सर्वात मोठे सर्च इंजन असलेल्या Google चे सीईओ Sundar Pichai यांचा आज 10 जून जन्मदिवस आहे की नाही? यावरून सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. Sundar Pichai यांना आज अनेक लोक ट्विटरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तर काही ट्विटर यूझर्स त्यांच्या जन्म तारखा वेगवेगळ्या असल्याचे म्हणत आहेत.
आज पिचाई यांचा जन्मदिवस साजरा केला जात आहे, मात्र, त्यांच्या जन्म तारखेवरून चर्चा सुरू आहे. Google वरच सुंदर पिचाई यांच्या जन्माच्या दोन तारखा दाखवल्या जात आहेत. एक तारीख आजची दाखवली जात आहे. तर दुसरी तारीख 12 जुलै दाखवली जात आहे. यावर Reuters च्या एका फॅक्ट बॉक्सनुसार, सुंदर पिचाई यांचा जन्म तामिळनाडूमध्ये 10 जून 1972 रोजी झाला. यात The New Indian Express चा हवाला देण्यात आला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो, की गुगल आपल्याच सीईओच्या दोन-दोन तारखा का दाखवत आहे?
Now according to #Google, Sir's birthday is on 12th July.
— Debanshi Biswas (@BiswasDebanshi) June 10, 2021
Yaar google bhi na!!! #SundarPichaipic.twitter.com/JtoejXKuy4
Google चा हा सर्च रिझल्ट पिचाई यांची बायोग्राफी Britannica वरून येत आहे. यात त्यांचा बर्थडे 12 जुलै सांगण्यात आला आहे. Britannica वर जेव्हापासून बर्थडे पब्लिश झाला, तेव्हापासून कदाचीत यात बदल केलेला नाही. हे 2 ऑक्टोबर 2016 रोजी प्रकाशित करण्यात आले होते.
Is today @sundarpichai's birthday?
— Hariram (@venkathari10) June 10, 2021
But Google shows it as July 12th!! #SundarPichai@Googlepic.twitter.com/m5Qajr2YFy
Sundar Pichai सध्या Alphabet चे हेड आहे. Alphabet ही गूगलची पॅरेंट कंपनी आहे. सुंदर पिचाई यांनी इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण Indian Institute of Technology मधून पूर्ण केले आहे. त्यांचे बालपण चेन्नईत गेले. सुंदर पिचाई यांनी Stanford University तून मास्टर डिग्री मिळविली आहे. यानंतर त्यांनी Wharton School मधून MBA केले. सुंदर पिचाई यांनी 2004 मध्ये Google जॉइन केले. त्यांनी गुगलमध्ये Google Toolbar आणि नंतर Google Chrome चे डेव्हलपमेंटदेखील साभाळले होते. Google Chrome सध्या सर्वाधिक प्रसिद्ध इंटरनेट ब्राउझर आहे.
— Amit Rajput (@Rajamit8077) June 10, 2021