जग-दुनिया कुठे पोहोचलीय! सोनी अजून वॉकमनवरच अडकलीय; किंमत तर पहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 01:25 PM2023-01-31T13:25:58+5:302023-01-31T13:26:15+5:30
स्मार्टफोनच्या जमान्यात आता लोक कुठे वॉकमन वापरतात नाही का...
सोनी या जगप्रसिद्ध कंपनीने नवीन वॉकमन लाँच केला आहे. स्मार्टफोनच्या जमान्यात आता लोक कुठे वॉकमन वापरतात नाही का, जग दुनिया कुठे पोहोचलीय पण सोनी अजून वॉकमनवरच अडकलीय असेही तुम्ही म्हणत असाल.
कंपनीचा दावा आहे की हे उपकरण इलेक्ट्रिक ऑडिओफाईल्स आणि हाय-फाय प्रेमींसाठी डिझाइन केले आहे. वॉकमन हा ९० च्या दशकात खूप प्रसिद्ध होता. अनेक लोक त्याचा वापर करत होते. याचा वापर संगीत ऐकण्यासाठी, रेकॉर्डिंग करण्यासाठी केला जात होता.
Sony ने Walkman NW-ZX707 च्या माध्यमातून पारंपारिक वॉकमनला आधुनिक तंत्रज्ञानात आणण्याचा प्रयत्न केला आहे. या वॉकमनमध्ये ५ इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. Hi-Res Audio द्वारे आवाजावर प्रक्रिया केली जाते आणि तो आवाज ऐकविला जातो. हा वॉकमन एका चार्जवर २५ तास चालू शकतो, असा दावा कंपनीने केला आहे. या वॉकमनमध्ये DSD Remastering Engine देण्यात आले आहे.
Sony Walkman NW-ZX707 ची किंमत पाहून तुम्हाला मात्र धक्का बसणार आहे. भारतात या वॉकमनची किंमत ७०००० रुपये ठेवण्यात आली आहे. हा वॉकमन सोनीच्या एक्स्क्लुझिव्ह शोरुममधून आजपासून खरेदी करता येणार आहे. सोनीचा हा वॉकमन क्लासिक ब्लॅक आणि गोल्ड व्हेरिएंट कलर पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. डिझाईनही असे काही ग्रेट नाहीय की त्यासाठी किंमत आकारली जातेय. ऑफरनंतरही वॉकमनची किंमत iPhone 13 आणि iPhone 14 पेक्षा जास्त आहे.