सावधान! देशातील प्रत्येक तिसरं Driving Licence आहे फेक, 'असं' करा झटपट चेक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2022 04:15 PM2022-05-13T16:15:50+5:302022-05-13T16:18:05+5:30

Driving Licence : देशात सध्या ड्रायव्हिंग लायसन्समधील प्रत्येक तिसरे ड्रायव्हिंग लायसन्स फेक आहे.

whether your Driving Licence is fake every third license in country is fake know how to check | सावधान! देशातील प्रत्येक तिसरं Driving Licence आहे फेक, 'असं' करा झटपट चेक 

सावधान! देशातील प्रत्येक तिसरं Driving Licence आहे फेक, 'असं' करा झटपट चेक 

googlenewsNext

नवी दिल्ली - कोणतीही व्यक्ती जर विना ड्रायव्हिंग लायसन्सने वाहन चालवत असेल तसेच तुम्हाला जर या गुन्ह्यात पकडले गेले तर 5 हजार रुपयाचा दंड द्यावा लागू शकतो. यासोबतच 3 महिन्यांच्या जेलची शिक्षा सुद्धा होऊ शकते. त्याच पद्धतीने फेक ड्रायविंग लायसन्सने वाहन चालवल्यास कडक नियम आहेत. ज्यात दंड या सोबत शिक्षेची तरतूद आहे. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सच्या व्हॅलिडिटीसंबंधी काही अडचण असल्यास या ठिकाणी सांगण्यात आलेल्या स्टेप्स द्वारे ड्रायव्हिंग लायसन्सची खरी माहिती समोर येईल. जाणून घ्या डिटेल्स.

प्रत्येक तिसरे ड्रायव्हिंग लायसन्स आहे फेक

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 2019 मध्ये एका कार्यक्रमात बोलताना सांगितले होते की, देशात सध्या ड्रायव्हिंग लायसन्समधील प्रत्येक तिसरे ड्रायव्हिंग लायसन्स फेक आहे. नवीन मोटर वाहन एक्ट संबंधी बोलताना सांगितले होते की, फेक ड्रायव्हिंग लायसन्स वर आळा घालता येईल. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आरटीओच्या चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण, आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं.

फेक लायसन्समुळे रस्ते अपघातात वाढ

NCRB च्या आकडेवारीनुसार, देशात प्रत्येक वर्षी रस्ते अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. रस्ते परिवहन मंत्रालयाच्या माहितीनुसार, जास्तीत जास्त अपघात हे अनट्रेड ड्रायव्हरमुळे होतात. हे लोक फेक लायसन्स द्वारे वाहन चालवायला सुरुवात करतात.

फेक ड्रायव्हिंग लायसन्स असं ओळखा

- सर्वात आधी तुम्हाला https://parivahan.gov.in/parivahan/# वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
- या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसवर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला Driving licence रिलेटेड सर्विसचा ऑप्शन दिसेल.
- तुम्ही या ऑप्शनवर क्लिक करून तुमच्या समोर सिलेक्ट स्टेटचे ऑप्शन निवडू शकता.
- तुमच्या समोर एक वेगळी विंडो ओपन होईल. या ठिकाणी तुमच्या समोर ड्रायव्हिंग लायसन्सचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक केल्यास Service on DL चे ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्हाला क्लिक करावे लागणार आहे.
-  तुमच्या समोर कंटिन्यूचा ऑप्शन दिसेल. या ठिकाणी क्लिक करावे लागेल. त्यानंतर आणखी एक वेगळी विंडो ओपन होईल.
- ज्यात तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि जन्म दिनांक आणि आपल्या राज्याची पुन्हा निवड करून त्यावर क्लिक करावे लागेल.
- ही प्रोसेस पूर्ण केल्यानंतर तुम्ही ओके केल्यानंतर पुन्हा ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल्स समोर येईल. जर ड्रायव्हिंग लायसन्सची डिटेल्स समोर आली नाही तर समजून जा की, तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स फेक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: whether your Driving Licence is fake every third license in country is fake know how to check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.