कोणावर विश्वास ठेवायचा? Apple स्टोअर वरून iPhone 15 खरेदी केला, फ्रॉड निघाला...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 09:46 AM2023-11-16T09:46:57+5:302023-11-16T09:47:15+5:30

आजकाल जग असे बनत चाललेय की कोणावरही विश्वास ठेवण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत.

Who to trust? Purchased iPhone 15 from Apple Store, Turns Out Fraud fake iphone 15 pro delevered | कोणावर विश्वास ठेवायचा? Apple स्टोअर वरून iPhone 15 खरेदी केला, फ्रॉड निघाला...

कोणावर विश्वास ठेवायचा? Apple स्टोअर वरून iPhone 15 खरेदी केला, फ्रॉड निघाला...

गेल्या काही वर्षांपासून ऑनलाईन प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट, अमेझॉन सारख्या वेबसाईटवरून स्मार्टफोन मागविले की त्यातून साबन, दगड निघत होते. म्हणून आता या कंपन्यांनी बहुतांशी ठिकाणी ओपन बॉक्स डिलिव्हरी सुरु केली आहे. तरीही असे फ्रॉड होतच आहेत. असे असताना आता Apple स्टोअर वरून देखील फेक iPhone 15 pro मिळू लागला तर तुम्ही काय कराल? 

आजकाल जग असे बनत चाललेय की कोणावरही विश्वास ठेवण्यासारखे दिवस राहिलेले नाहीत. अॅप्पल कंपनीच्या अधिकृत स्टोअरवरून मागविलेला आयफोनही फ्रॉड निघाला आहे. एका ग्राहकाला आयफोन ऑर्डर केला आणि त्याला अँड्रॉईडवर चालणारा फेक आयफोन डिलिव्हर झाला आहे. 

इंग्लंडमधील हा प्रकार आहे. एका व्यक्तीला आयफोन १५ प्रो मागविणे महागात पडले आहे. त्याने अॅप्पलच्या खऱ्या वेबसाईवरून आयफोन मागविला होता. अॅप्पल स्टोअरवरून त्याला नकली आयफोन पाठविण्यात आल्याने त्याचे डोळे पांढरे झाले आहेत. हा फेक आयफोन खऱ्याखुऱ्या आयफोनसारखाच दिसतो. तसेच त्याला २५६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. 

परंतू, जेव्हा या ग्राहकाने तपासणी केली तेव्हा त्याला त्यात अँड्रॉईड असल्याचे दिसले. त्याने लगेचच ऑर्डर नंबर आणि ईमेलची डिटेल्स ऑनलाईन शेअर केले. 

असे का होते? कोण करते?
जेव्हा तुम्ही फोन ऑर्डर करता तेव्हा त्याची ऑर्डर थेट अधिकृत वेबसाइटवर जाते. फोन अधिकृत स्टोअरमधून थर्ड पार्टी डिलिव्हरी कंपनीकडे पाठविला जातो. ही डिलिव्हरी कंपनीच युजरला फोन डिलिव्हरी करते. साधारणपणे गोदाम किंवा डिलिव्हरी पार्टनरकडून फसवणुकीच्या घटना घडतात. 

Web Title: Who to trust? Purchased iPhone 15 from Apple Store, Turns Out Fraud fake iphone 15 pro delevered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.