अलर्ट! चीनी अॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 02:40 PM2020-06-18T14:40:12+5:302020-06-18T14:46:26+5:30
TikTok पासून UC ब्राऊझर, हॅलो अॅपपर्यंत सर्व चीनी अॅप्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. मात्र या अॅप्सचा वापर करणं अत्यंत धोकादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे.
नवी दिल्ली - भारत आणि चीनदरम्यान असलेला तणाव वाढत आहे. सीमेवरील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांच्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले. देशभरात चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेकांनी तर आपल्या फोनमधून चीनी अॅप्स देखील हटवून याची सुरुवात केली आहे. TikTok पासून UC ब्राऊझर, हॅलो अॅपपर्यंत सर्व चीनी अॅप्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. मात्र या अॅप्सचा वापर करणं अत्यंत धोकादायक असल्याची माहिती आता समोर आली आहे. तुमच्या फोनमध्ये असे अॅप्स असल्यास काय होऊ शकतं ते जाणून घेऊया.
चीनी अॅप युजर्सना धोका पोहचवू शकतात. एका इनफॉर्मेशन सिक्यॉरिटी फर्मने केलेल्या रिसर्चमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला आहे. Helo, Shareit आणि UC ब्राऊझर यासारखे 10 पैकी 6 लोकप्रिय चीनी अॅप्स युजर्सकडे कॅमेरा आणि मायक्रोफोनचा अॅक्सेस मागतात. मात्र या अॅप्समध्ये या अॅक्सेसचे कोणतेही काम नसते. पुण्याच्या Arrka Consulting चे सह संस्थापक संदीप रावने यांनी हे जगभरातील टॉप 50 अॅप्सकडून मागितलेल्या परमिनशनपेक्षा 45 टक्के जास्त असल्याचं म्हटलं आहे.
काही चीनी अॅप्स अनेकदा लोकेशनचा अॅक्सेस मागतात. Arrka Consulting च्या सह संस्थापक शिवांगी नाडकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूसी ब्राऊझर लोकेशनचा अॅक्सेस मागतं. ही व्यक्ती कुठून माहिती सर्च करतेय याची माहिती मिळवता यावी यासाठी कंपनी हे करतं. यासारखे अॅक्सेस हा फूड डिलिव्हरी देणाऱ्या अॅप्ससाठी गरजेचा आहे. अॅप्स युजर्संचा डेटा सात विदेशी एजन्सीला ट्रान्सफर करते.
.India China Faceoff : ... म्हणून चीनने सांगितला नाही मृत सैनिकांचा आकडाhttps://t.co/AyVPppoH13#IndiaChinaFaceOff#IndiaChinaBorder#IndiaChinaBorderTension#China
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2020
रिपोर्टनुसार, टिकटॉक आपला डेटा चायना टेलिकॉमला पाठवतो. तर विगो व्हिडिओ आपला डेटा Tencent, ब्यूटीप्लस आपला डेटा Meitu आणि QQ व UC ब्राउजरला डेटा Alibaba पर्यंत पोहोचवतो. चीनी अॅप्सवर हेरगिरी आणि धोका करीत असल्याचा आरोप करण्यात आलेले आहेत.2017 मध्ये भारतीय इंटेलिजन्स एजन्सीने अशा 42 मोबाइल अॅप्लिकेशन्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. जे चीनी डेव्हलपर्सने तयार केलेला आहे. किंवा चीन संबंधी त्यात लिंक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
CoronaVirus News : साडी खरेदी करा आणि कोरोनाविरोधात लढा... 'कोरोना कवच'मध्ये आहे 'या' स्पेशल गोष्टींचा समावेशhttps://t.co/XJ9NltAUiG#coronavirus#CoronaUpdatesInIndia#COVID19India#CoronavirusIndia
— Lokmat (@MiLOKMAT) June 18, 2020
महत्त्वाच्या बातम्या
तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण
Today's Fuel Price : इंधन दरवाढीचा भडका! सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले
CoronaVirus News : बापरे! 'या' व्यक्तींसाठी कोरोना ठरतोय जीवघेणा; 12 पट अधिक आहे मृत्यूचा धोका