PUBG Mobile वर सरकारने बंदी का घातली नाही?; जाणून घ्या यामागचं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 05:32 PM2020-06-30T17:32:04+5:302020-06-30T17:36:42+5:30

भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला.

Why didn't the government ban PUBG Mobile ?; Find out the real reason behind this | PUBG Mobile वर सरकारने बंदी का घातली नाही?; जाणून घ्या यामागचं खरं कारण

PUBG Mobile वर सरकारने बंदी का घातली नाही?; जाणून घ्या यामागचं खरं कारण

googlenewsNext

नवी दिल्ली: भारताची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि अखंडता यांना धोका ठरू शकणाऱ्या ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने सोमवारी रात्री जाहीर केला. भूसीमेवर डोळे वटारून पाहणाऱ्या चीनशी समर्थपणे दोन हात करत असतानाच हा निर्णय घेऊन सीमांचे बंधन नसलेल्या सायबर विश्वातही या कपटी शेजारी देशाविरुद्ध भारताने एक प्रकारे युद्धाचे बिगुल फुंकले आहे. 

बाजारात कोट्यवधींच्या संख्येने विकल्या जाणाऱ्या चिनी कंपन्यांच्या मोबाईल फोनमध्ये यापैकी बरीच लोकप्रिय अ‍ॅप इनबिल्ट पद्धतीने उपलब्ध असल्याने सरकारने या अ‍ॅप्सचा वापर करण्यासही बंदी घातली आहे.

केंद्र सरकारने बंदी घातलेल्या चायनीज अ‍ॅप्समध्ये टिकटॉक पासून यूसी ब्राऊझर, हेलो अ‍ॅप आणि शेअरइट यासारख्या प्रसिद्ध अ‍ॅप्सचा समावेश आहे. मात्र या यादीत PUBG Mobile आणि Zoom अ‍ॅप्सचा समावेश नसल्याने या दोन अ‍ॅप्सवर बंदी का घालण्यात आली नाही, असे प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केले जात आहे.

पबजी हा जगप्रसिद्ध गेम दक्षिण कोरियाची व्हिडिओ गेम कंपनी ब्लूहोलच्या सब्सिडियरी कंपनीने बनवला आहे. या गेमचे कनेक्शन Tencent Games चीनची कंपनीसोबत आहे. टेंसेंट कंपनीने पबजीला चीनमध्ये लाँच करण्याची ऑफर दिली होती. मात्र काही वर्षांनंतर पबजीला चीनमध्ये बंदी घातली आहे. त्यामुळे पबजीची ऑनरशीप संयुक्त आहे. त्याचप्रमाणे  ZOOM अ‍ॅप ही एक अमेरिकन कंपनी आहे. झूमचे संस्थापक  Eric Yuan यांचा जन्म चीनमध्ये झाला होता. मात्र ते अमेरिकन नागरिक आहे.

दरम्यान, लडाख सीमेवर भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढला आहे. गेल्या 15 जूनला लडाखमधील गलवान खोऱ्यात एलएसी सीमेवर भारत आणि चीनच्या सैन्यांत हिंसक चकमक झाली. यात भारताचे 20 जवान शहीद झाले. यानंतर देशात चीन विरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.  याशिवाय, भारतात विकल्या जाणाऱ्या चिनी वस्तूंवर आणि चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बहिष्कार टाकण्याची मागणी अनेकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.

बंदी घालण्यात आलेले  चिनी अ‍ॅप्स खालील प्रमाणे- 

1. TikTok

2. Shareit

3. Kwai

4. UC Browser

5. Baidu map

6. Shein

7. Clash of Kings

8. DU battery saver

9. Helo

10. Likee

11. YouCam makeup

12. Mi Community

13. CM Browers

14. Virus Cleaner

15. APUS Browser

16. ROMWE

17. Club Factory

18. Newsdog

19. Beutry Plus

20. WeChat

21. UC News

22. QQ Mail

23. Weibo

24. Xender

25. QQ Music

26. QQ Newsfeed

27. Bigo Live

28. SelfieCity

29. Mail Master

30. Parallel Space 31. Mi Video Call – Xiaomi

32. WeSync

33. ES File Explorer

34. Viva Video – QU Video Inc

35. Meitu

36. Vigo Video

37. New Video Status

38. DU Recorder

39. Vault- Hide

40. Cache Cleaner DU App studio

41. DU Cleaner

42. DU Browser

43. Hago Play With New Friends

44. Cam Scanner

45. Clean Master – Cheetah Mobile

46. Wonder Camera

47. Photo Wonder

48. QQ Player

49. We Meet

50. Sweet Selfie

51. Baidu Translate

52. Vmate

53. QQ International

54. QQ Security Center

55. QQ Launcher

56. U Video

57. V fly Status Video

58. Mobile Legends

59. DU Privacy

Web Title: Why didn't the government ban PUBG Mobile ?; Find out the real reason behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.