कोणती आहेत फोन फुटण्याची मुख्य कारणे? चुकूनही करु नका 'ही' कामे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2024 03:35 PM2024-08-02T15:35:29+5:302024-08-02T15:36:02+5:30
कधी चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट झाला तर कधी खिशातच फोनचा स्फोट झाला. तरीही जास्तीत जास्त लोक फोन वापरताना खूपसाऱ्या चुका करतात.
नेहमीच फोन फुटण्याच्या कितीतरी घटना समोर येत असतात. यात अनेकजण गंभीर जखमी होतात तर कधी काही लोकांचं जीवही जातो. कधी चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट झाला तर कधी खिशातच फोनचा स्फोट झाला. तरीही जास्तीत जास्त लोक फोन वापरताना खूपसाऱ्या चुका करतात. जे त्यांना चांगलंच महागात पडतं. त्यामुळे तुम्हाला फोनमध्ये स्फोट होण्याची आणि आग लागण्याची कारणं माहीत असली पाहिजे. जी आज आम्हाला सांगणार आहोत.
चार्जिंगला लावून फोन वापरु नका
फोन फुटण्याच्या कारणांमध्ये मुख्य कारण आहे ओव्हर हिटींग. फोनच्या अति वापरामुळे पोन गरम होतो. चार्जिंगला फोन लावल्यावर त्याचा वापर करु नका. फोन पूर्णपणे चार्ज होऊ द्या. त्यावर गेम खेळू नका किंवा आणखी कोणतही काम करु नका. चार्जिंगला लावलेल्या फोनवर बोलणे तुमच्यासाठी सर्वात महागात पडू शकतं. शक्य झाल्यास फोन स्विच ऑफ करुन चार्जिंग करा.
रात्रभर फोन चार्जिंगला लावू नका
काही लोकांना फोन रात्रभर चार्जिंगला लावून झोपण्याची सवय असते. असे करणे फारच धोकादायक आहे. ओव्हर चार्जिंगही फोन फुटण्याचं एक मुख्य कारण आहे.
ओरिजनल चार्जरचाच वापर करा
अनेकदा ओरिजनल चार्जर खराब झाल्यावर अनेकजण पैसे वाचवण्यासाठी स्वस्त चार्जर खरेदी करतात. पण असे करणे फारच घातक आङे. ज्या कंपनीचा फोन आहे त्या कंपनीचाच चार्जर विकत घ्यावा. असे करुन तुम्ही संभावित धोका टाळू शकता.
सूर्याच्या थेट किरणांपासून दूर ठेवा
फोन कधीही अशा जागी ठेवू नका जिथे त्यावर सूर्याची किरणे थेट पडतील. सूर्याच्या किरणांमुळे फोनची बॉडी गरम होते आणि यानेही ओव्हर हिटींग होते. त्यामुळे फोनचा बॅलन्स बिघडतो आणि फोन फुटण्याचा धोका वाढतो.
GPS अॅप्स
काही अॅप्समुळेही फोन गरम होतो. अनेकदा GPS नॅविगेशन अॅप्स वापरताना ही समस्या येते. गुगल मॅप्स, उबेर, ओलासारखे GPS लोकेशन बेस्ड अॅप वापरल्याने फोन ओव्हर हिटींग करतो. अशावेळी या अॅप्सचा वापर कमी करा आणि कारण नसताना हे अॅप्स ओपन करु नका.