मोबाईलवर अडल्ट जाहिराती किंवा नोटिफिकेशन का येतात? तुम्हीच कारणीभूत आहात, ते कसे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 08:18 PM2022-08-22T20:18:56+5:302022-08-22T20:20:15+5:30

तुमच्या मोबाईलवर अडल्ट अॅड्स येतात? गूगल अशा जाहिराती पाठवत नाही, मग अशा जाहिराती का येतात...

Why do we see adult ads or notifications on mobile ? know the reason | मोबाईलवर अडल्ट जाहिराती किंवा नोटिफिकेशन का येतात? तुम्हीच कारणीभूत आहात, ते कसे...

मोबाईलवर अडल्ट जाहिराती किंवा नोटिफिकेशन का येतात? तुम्हीच कारणीभूत आहात, ते कसे...

googlenewsNext

स्मार्टफोन आणि इंटरनेटचे जग वाटते तितके सोपे नाही. प्रत्येक क्षणी आपल्यावर पाळत ठेवलेली असते. प्रत्येक वेळी तुमची हेरगिरी करणे हाच या मागचा उद्देश नसतो, पण बऱ्यावेळा आपल्या खासगी गोष्टी ऐकल्या-पाहिल्या जातात. अनेक लोक तक्रार करतात की, त्यांना फोनमध्ये अडल्ट जाहिराती किंवा सेक्शुअल कंटेंटचे नोटिफिकेशन येत आहे.

Google किंवा इतर अॅप्स तुम्हाला अशाप्रकारचे नोटिफिकेशन पाठवतात का? असं अजिबात नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, Google आणि इतर अॅप्स तुम्हाला तुमच्या वापरानुसार जाहिराती दाखवतात. म्हणजेच तुमच्या वागण्यातून किंवा मोबाईलच्या वापरातून, तुमचा अशा आशयाकडे कल असल्याचे समजते.

अडल्ट अॅड्स का दिसतात?
Google किंवा Facebook सारख्या इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहता त्या जाहिराती अल्गोरिदम फॉलो करतात. हे अल्गोरिदम युजरची निवड, मीडिया वापर आणि पसंतीवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, तुम्ही अनावधानाने किंवा स्वेच्छेने अडल्ट वेबसाइट पाहिली असेल, तर नंतर तुमचा डिव्हाइस त्याच्या अल्गोरिदममध्ये तशाच प्रकारचे अपडेट करतो आणि तुम्हाला अशा जाहिराती दिसू लागतात.

इंस्टाग्राम रील्स ते यूट्यूब अशा प्रकारे काम करतात
हे अल्गोरिदम तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींसाठीच नाही, तर तुम्ही सोशल मीडियावर पाहता त्या चांगल्या वाईट कंटेंटवरही काम करते. काही लोक तक्रार करतात, त्यांनना एकाच प्रकारच्या रील किंवा सोशल मीडिया पोस्ट दिसतात. याचे कारण म्हणझे, तुम्ही यापूर्वी तशा प्रकारचा कंटेट पाहिलेला असतो. ज्या गोष्टी तुम्ही वारंवार पाहता, तशा प्रकारचा कंटेट तुम्हाला दिसतो. 

नोटिफिकेशन्स का येतात?
तुमच्याकडे येणारे काही नोटिफिकेशन्स Google किंवा Chrome वरून येतात. हे तुमच्या सर्चवर आधारित असतात, तर नोटिफिकेशन तुम्हाला वेबसाइटवरुन पाठवले जातात. तुम्हाला अडल्ट अॅड्स किंवा नोटिफिकेशन मिळत असतील, तर तुम्ही अशा वेबसाइटला व्हिजीट केली असेल. नोटिफिकेशन सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ते सहज बंद करू शकता.

Web Title: Why do we see adult ads or notifications on mobile ? know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.