Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 18:13 IST2024-10-22T18:11:23+5:302024-10-22T18:13:02+5:30
गुगलमध्ये कर्मचाऱ्यांना मोफत भोजन दिलं जातं. गेल्या अनेक वर्षापासून गुगलची ही पॉलिसी राबवत आहे.

Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
Google मध्ये नोकरी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. याचे कारण म्हणजे गुगलमध्ये मिळणाऱ्या सुविधा आहे. गुगल आपल्या कर्मचाऱ्यांची खूप काळजी करते. कर्मचाऱ्यांना उत्तम दर्जाचे भोजन देतंय. यासाठी गुगल मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करते. तसेच अन्यही सुविधा दिल्या जातात, आपण सोशल मीडियावर गुगलच्या कर्मचाऱ्यांचे अनेक रिल्स पाहिल्या असतील. गुगल एवढा पैसा खाण्यावर का खर्च करते असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नाचे उत्तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिले आहे. मोफत जेवणावर मोठ्या गुंतवणुकीचा उद्देश खूप खोल आहे, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
अलर्ट! UPI फ्रॉडपासून सावधान; हॅकर्स ओढतात जाळ्यात, एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
एका मुलाखतीत सुंदर पिचाई म्हणाले, मला आठवतं मी जेव्हा गुगलमध्ये काम करत होतो तेव्हा मी कॅफेमध्ये जात होतो तेव्हा एखाद्याला भेटत होतो यावेळी आमच्यात एखाद्या गोष्टीबद्दल चर्चा व्हायची तेव्हा नवीन नवीन कल्पना सुचत होत्या. ज्यावेळी कर्मचारी एकत्र जेवणासाठी जमतात तेव्हा तिथे परस्पर सहकार्याचे वातावरण तयार होते आणि त्यातून नाविन्य निर्माण होण्यास मदत होते, असं सुंदर पिचाई म्हणाले.
सुंदर पिचाई यांनी सांगितले की, मोफत भोजन हे आर्थिक ओझे नाही तर सर्जनशीलता आणि समुदाय उभारणीसाठी दीर्घकालीन गुंतवणूक आहे. मोफत जेवणाव्यतिरिक्त, कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा, फ्लेक्सिबल रिमोट वर्क पर्याय देते. या सर्व फायद्यांसह, Google हे उद्योगातील सर्वात आकर्षक कामाचे ठिकाण आहे.
एवढे सगळे फायदे देऊनही गुगलच्या बेनिफिट्समध्ये मोठा बदल झाला आहे, असं सुंदर पिचाई यांनी सांगितले. २०२३ मध्ये, कंपनीने आपली ऑफर सुव्यवस्थित करण्याची घोषणा केली होती. यामध्ये काही ऑफिस कॅफेचे तास कमी करणे आणि मायक्रो किचन एकत्र करणे आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये Google चे फायदे अजूनही सर्वोत्तम आहेत.