मोबाईलच्या डाव्या बाजूलाच का असतो कॅमेरा?; जाणून घ्या, यामागचं खास कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 08:23 PM2022-08-14T20:23:10+5:302022-08-14T20:35:54+5:30
सुरुवातीला जे स्मार्टफोन येत असत त्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरे हे मध्यभागी असायचे परंतु हळूहळू फोनचा कॅमेरा लेफ्ट साइडला गेले.
स्मार्टफोनमध्ये वेगवेगळे अपडेट येत असतात. स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मोबाईलमुळे अनेक कामं घरी बसून केली जातात. सोबत मनोरंजन केले जाते. जर तुमच्याकडे सुद्धा स्मार्टफोन असेल तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच पाहिली असेल की, स्मार्टफोनचा कॅमेरा हा नेहमी डाव्या बाजूलाच असतो. परंतु तो कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो, असा प्रश्न अनेकांना पडत नाही किंवा पडला असेल. आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत.
सुरुवातीला जे स्मार्टफोन येत असत त्या स्मार्टफोनमध्ये कॅमेरे हे मध्यभागी असायचे परंतु हळूहळू फोनचा कॅमेरा लेफ्ट साइडला गेले. याची सर्वात आधी सुरुवात आयफोनपासून सुरू करण्यात आली. आयफोनचे जास्तीत जास्त फोनमधील कॅमेरे हे लेफ्ट साइडला देणे सुरू केले.
कॅमेरा डाव्या बाजूलाच का असतो?
कॅमेराला डाव्या बाजूला ठेवण्यामागे मोबाईलची डिझाइन नव्हे तर एक वेगळेच कारण आहे. जास्तीत जास्त लोक हे डाव्या हाताने फोनचा वापर करत असतात. त्यामुळे लेफ्ट साइडला लावलेल्या कॅमेरातून फोटो किंवा व्हिडीओ शूट करणे सोपे जाते. तसेच कॅमेराला फिरवून लँडस्केप करतो. त्यामुळे मोबाईल कॅमेरा वरच्या बाजूला जातो. त्यामुळे हे सोपे जाते. लँडस्केप फोटो घेऊ शकता. यामुळे मोबाईल लेफ्ट साइडला असतात.
सेल्फी कॅमेरात असतात मिरर इफेक्ट
ज्यावेळी आपण फ्रंट कॅमेरामधून सेल्फी घेतो. त्यावेळी सेल्फी उलटा येतो. म्हणजेच त्या पोझिशन लेफ्ट टू राइट किंवा राइट टू लेफ्ट होते. त्यामुळे तुम्हाला सेल्फीत जे नाव दिसते ते उलटे दिसते. जास्तीत जास्त मोबाईलमध्ये ही अडचण असते. कारण, जास्तीत जास्त मोबाईलमध्ये सेल्फी कॅमेरात मिरर इफेक्ट असतो. त्यामुळे सेल्फी घेताना कॅमेरात व्यवस्थित दिसतो. परंतु, फोटो घेतल्यानंतर सेल्फीतील अक्षरे उलटी दिसतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.