इंटरनेट ब्रेक का होतेय? मोठे कारण आले समोर; भूतान, बांगलादेशचे इंटरनेट भारतापेक्षाही पॉवरफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 05:36 AM2023-08-10T05:36:40+5:302023-08-10T05:36:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : इंटरनेटचा जगभर वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याआधारे अधिकाधिक सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ लागल्या ...

Why is the internet breaking? The big reason came up; Bhutan, Bangladesh internet more powerful than India | इंटरनेट ब्रेक का होतेय? मोठे कारण आले समोर; भूतान, बांगलादेशचे इंटरनेट भारतापेक्षाही पॉवरफुल्ल

इंटरनेट ब्रेक का होतेय? मोठे कारण आले समोर; भूतान, बांगलादेशचे इंटरनेट भारतापेक्षाही पॉवरफुल्ल

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इंटरनेटचा जगभर वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याआधारे अधिकाधिक सेवा-सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या जाऊ लागल्या आहेत. इंटरनेट ताकदवान असेल तर अनेक महत्त्वाच्या सेवा मोठ्या जनसमुदायापर्यंत वेगाने पोहोचवणे शक्य होते. नेमके याच बाबतीत शेजारचे भूतान, बांगलादेश आणि श्रीलंका आदी देशांचे इंटरनेट भारतापेक्षा ताकदवान असल्याचे एका अहवालातून पुढे आले आहे. स्वयंसेवी संस्था इंटरनेट सोसायटीच्या हा अहवाल तयार केला आहे. 

इतर कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा त्रुटी असल्या तरी त्याही स्थितीत इंटरनेट ताकदवान असेल तर कोणत्याही सेवा अखंडपणे देणे शक्य होते. त्यामुळेच कोणत्याही देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये इंटरनेट कनेक्टिव्हीचे महत्त्व अनन्यसाधारण असते, असे इंटरनेट सोसायटीचे म्हणणे आहे. 

ताकदवात इंटरनेटच्या बाबतीत दक्षिण आशियातील देशांमध्ये भारत सहाव्यास्थानी आहे. पाकिस्तानचा क्रमांक भारतानंतर लागतो, असे हा अहवाल सांगतो. इराण आणि अफगाणिस्तान या देशांमधील इंटरनेटची स्थितीही चांगली नसल्याचे या अहवालातून दिसते. 

भारतातील इंटरनेट सरासरीपेक्षा सुरक्षित
nइंटरनेट किती ताकदवान आहे हे देशातील सेवेची एकूण पायाभूत रचना कशी आहे, सेवेची कामगिरी किती परिणामकारक आहे, सेवेची सुरक्षितता आणि बाजार अनुरूपता याच्या आधारे निश्चित केले जाते.
nइंटरनेट सुरक्षेच्या बाबतीत भारताची स्थिती सरासरीपेक्षा चांगली आहे. अधिक वेगासाठी लागणारी इंटरनेट प्रोटोकॉल संस्करण ६ (आईपीवीही प्रणाली वापरण्याच्या बाबतीत जगात भारत सर्वात पुढे आहे.

‘डिजिटल पाकिस्तान’ 
हे आजही एक स्वप्नच

nइंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल प्रशासन याच्या बाबतीत पाकिस्तानातील स्थिती अत्यंत खराब असल्याचे मानवाधिकार संघटनेकडून केलेल्या पाहणीत समोर आले होते. 
nकाही राज्यांनी सरकारी सेवा ऑनलाइन करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले असले तरी ते तोकडे आहेत. २०२२ मध्ये पाकिस्तानात एक लाखाहून अधिक सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

Web Title: Why is the internet breaking? The big reason came up; Bhutan, Bangladesh internet more powerful than India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.